सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

व्हायरल ताप, पाठदुखी आणि…; मालिका संपल्यानंतरही ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्री रमली शूटिंगच्या आठवणीत, म्हणाली, मुसळधार पावसात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 20, 2025 | 12:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aai kuthe kay karte fame actress

व्हायरल ताप, पाठदुखी आणि…; मालिका संपल्यानंतरही 'आई कुठे…' फेम अभिनेत्री रमली शूटिंगच्या आठवणीत, म्हणाली, मुसळधार पावसात…"

aai kuthe kay karte fame actress : मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असल्या तरी या सुंदर मनोरंजनामागे कलाकारांची खूप मेहनत असते. बरेचदा ही कलाकार मंडळी अहोरात्र शूटिंग करत आपला अमूल्य वेळ देतात. तर काही कलाकार मंडळी ही घरापासून दूर राहत शूटिंगला प्राधान्य देतात. यांत ते कुठेही धुसफूस न करता शूटिंगला वेळेवर पोहोचतात, शूटिंगच्या नादात बरेचदा त्यांचे जेवण करण्याकडे लक्षही नसते. तर काहीवेळा ते आजारपणातही आपल्यामुळे चित्रीकरणात खंड पडू नये म्हणून मेहनत घेताना दिसतात. तर बरेचदा कलाकार सेटवर ट्राफिकमधून पोहोचलेले असतात, या ट्राफिकचा व्हिडीओ त्यांनी अनेकदा शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

अशा या सगळ्या धावपळीच्या त्रासामुळे कलाकारांच्या प्रकृती बिघडतात, मात्र Show must go on म्हणत ही मंडळी नेहमीच तत्पर असतात. अशातच मालिकाविश्वातील एका अभिनेत्रीने याच संघर्षाची आठवण चाहत्यांसह शेअर केली आहे. आई कुठे काय करते या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ही मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेपैकी एक होती. या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही प्रत्येकजण मालिकेची आठवण काढताना दिसतं.

आणखी वाचा –“Show must go on म्हणणं सोपं आहे?”, पूर्णा आजींना जाऊन चार दिवस होताच जुई गडकरीला येतेय आठवण, भावुक होत म्हणाली, “शेवटचा व्हिडीओ…”

View this post on Instagram

A post shared by Kaumudi Walokar (@kaumudiwalokar)

अशातच मालिकेतील अभिनेत्री कौमुदी वाल्होकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. कौमुदीने मालिकेतील गेल्या वर्षीच्या मंगळागौरच्या शूटिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि यामध्ये तिने मालिकेच्या शूटिंगच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. कौमुदीने या व्हिडीओसह कॅप्शन देत म्हटलं की, “शूट! व्हिडीओ जुना असला तरी तो दिवस अजून डोळ्यासमोर आहे. मंगळागौरीचं शूट, मागचं वर्ष. एकीकडे भारी-भारी सीन आणि खेळ सुरु, तर दुसरीकडे पाऊस, दमट हवा, आणि शरीर अक्षरशः “बस झालंय” असं ओरडत होतं. संपूर्ण सेटवर कुणाला ताप, कुणाला पाठदुखी, कुणाचे गुडघे गेलेले. आणि मी? व्हायरल तापामध्ये full down”.

आणखी वाचा – “माझी आई मला आणून द्या”, आईच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना, दुःखातून सावरणं झालंय कठीण…

अभिनेत्रीने पुढे म्हटलं, “६.३० चा कॉलटाइम. Electral, ORS, तापाच्या गोळ्या. असं वाटलं जणू Makeup Kit पेक्षा Medical Kit जास्त मोठं आहे. पण काय करणार? कॅमेऱ्यासमोर चेहऱ्यावर हसू, आणि डोळ्यात ताकद हवीच. कसेबसे धावपळीचे ते sequences रात्री १० वाजता संपवले. आणि मग ठाण्याहून पुण्यापर्यंत, मुसळधार पावसात गाडी चालवत पोचले. (हो, ड्रायव्हिंग पण स्वतःच केलं… bonus stunt scene!).खरंच, तो दिवस ऍक्टिंगपेक्षा जास्त endurance test होता. पण अशा दिवसांमुळेच आठवणींना वजन येतं”.

Tags: aai kuthe kay kartemarathi actressmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Next Post
Mumbai heavy rain

ट्रकने प्रवास करत सेट गाठला आणि…; 'कोण होतीस तू…' मालिकेच्या कलाकारांची भर पावसात तारांबळ, व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.