सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ट्रकने प्रवास करत सेट गाठला आणि…; ‘कोण होतीस तू…’ मालिकेच्या कलाकारांची भर पावसात तारांबळ, व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 20, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mumbai heavy rain

ट्रकने प्रवास करत सेट गाठला आणि...; 'कोण होतीस तू...' मालिकेच्या कलाकारांची भर पावसात तारांबळ, व्हिडीओ समोर

Mumbai heavy rain : गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने मुंबईत अक्षरशः थैमान घातलं आहे. सोमवारी रात्रीपासून झालेली पावसाची सुरुवात अगदी काल रात्रीपर्यंत सुरु होती. मुंबईत तर हवामान खात्याने रेड अलर्ट दिला होता. तसेच शाळा, कॉलेजेसला सुट्टी जाहीर केली होती. शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांनाही सुट्टी देण्यात आली होती. यादरम्यान मुंबईची लाईफलाईन रेल्वे सेवा पूर्णतः ठप्प झालेली पाहायला मिळाली. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचलेले दिसले. या दरम्यान अनेक कामावर जाणाऱ्या नागरिकांना प्रवासाचा त्रास सहन करावा लागला.

सार्वजनिक मार्गाने वाहतूक करणाऱ्या नागरिकांना प्रवासाचा फार वाईट अनुभव आला. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यातून पायी वाट काढत अनेक नागरिक कामाच्या ठिकाणी वा घरी पोहोचले. सामान्य मुंबईकरांबरोबरच मालिकाविश्वातील कलाकार मंडळींनाही शूटिंगसाठी सेटवर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. अनेक कलाकारांनी तुंबलेल्या पाण्यातून वाट काढत मालिकेचा सेट गाठलेला पाहायला मिळाला. याचे अनेक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले.

आणखी वाचा – “माझी आई मला आणून द्या”, आईच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना, दुःखातून सावरणं झालंय कठीण…

View this post on Instagram

A post shared by Revati Lele (@me_revati)

मनोरंजनाला ब्रेक नाही म्हणत स्टार प्रवाह वाहिनीच्या कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेतील कलाकार गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांनी तुंबलेल्या पाण्यातून मार्ग काढत सेट गाठल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. याच मालिकेतील अभिनेत्री रेवती लेले हिनेदेखील इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत पावसाने त्यांचे झालेले हाल दाखवले. यावेळी तर मालिकेतील कलाकारांनी घरी जाण्यासाठी चक्क ट्रकने प्रवास केला.

आणखी वाचा – “Show must go on म्हणणं सोपं आहे?”, पूर्णा आजींना जाऊन चार दिवस होताच जुई गडकरीला येतेय आठवण, भावुक होत म्हणाली, “शेवटचा व्हिडीओ…”

पावसाच्या पाण्यातून वाट काढतानाचा हा अनुभवव रेवतीने तिच्या शब्दांत व्यक्त केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “काय दिवस होता. संपूर्ण शहरात पाणी साचलेले, रस्ते जलमय आणि आम्हाला आमच्या गाड्याही सेटच्या बाहेर पार्क कराव्या लागल्या. तुम्ही कल्पना करु शकता का, आम्ही सेटवर कसे पोहोचलो? तर ट्रकने खरंच, “शो मस्ट गो ऑन.” आणि तो झाला सुद्धा! संपूर्ण टीम, क्रूपासून कलाकारांपर्यंत सगळे वेळेवर पोहोचले आणि दिवसभर कुठलीही तक्रार न करता काम केलं. सगळ्या टीमचं खूप कौतुक”.

Tags: marathi actressmarathi serialMumbai heavy rain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Usha Nadkarni audition

"ऑडिशनसारखी फालतू काम करत नाही", ऑडिशन मागताच उषा नाडकर्णी भडकल्या, म्हणाल्या, " स्क्रिप्ट फेकली आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.