सध्या इंस्टाग्राम वर अनेक ट्रेंड सुरु असतात. आणि आपले लाडके कलाकार हे ट्रेंड फ़ॉलो करण्यात कुठे ही कमी पडत नाहीत. पोस्ट ऑफिस उघड आहे, या मालिकेने असाच एक ट्रेंड सुरु केला तो म्हणजे लहानपणीचे फोटो शेअर करणे. अनेक कलाकार त्यांचे लहानपणीचे फोटो शेअर करत आहेत. आणि त्यांच्या आताच्या ग्लॅमर्स अदजानंतर, त्यांच्या लहानपणीच्या फोटोवरून त्यांना ओळखणं शक्यच होत नाही. (Marathi Actress)
पहा कोण आहे ही अभिनेत्री ? (Marathi Actress)
असाच एका अभिनेत्रीने तिचा लहानपणीच फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवरून तुम्ही तिला ओळखलंत का? तर ही आहे अभिनेत्री काजल काते म्हणजेच, माझी तुझी रेशीमगाठ मधील शेफाली. या मालिकेत तिचा अगदी मजेशीर स्वभाव पहायला मिळाला. तिची आणि नेहा ची मैत्री, संकर्षण सोबतची तिची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तिच्या या लहानपणीच्या फोटोमध्ये ती अगदी सालस दिसत आहे. आणि तिचा आताचा बोल्ड ग्लॅमर्स लुक बघता तीला या फोटो वरून ओळखणं कठीणच होत आहे. (Marathi Actress)

या मालिकेत काजलने अगदी मजेशीर व्यक्तीरेखा साकारली होती.तिच्या शेफाली या पात्राने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. तिचा विनोदी अंदाज, आणि दुसऱ्या बाजूला घरची परिस्थिती या दोन्ही बाजूंचा समतोल काजलने तिच्या अभिनयातून साधला. नेहाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी शेफाली पाहून प्रत्येकाला असं वाट्टेल कि एक अशी मैत्रीण आपली ही असावी. संकर्षण आणि काजल या जोडीला ही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल.
हे देखील वाचा : या अभिनेत्रीला ओळखलंत का ?रेशीमगाठ मालिकेत साकारलीय खलनायिका
तसेच काजलच तिच्या सह-कलाकारांसोबत खूप छान ऑफस्क्रीन बॉण्डिंग पहायला मिळत. सेट वरची धमाल इत्तर कलाकारानंसोबतचे रील ती तिच्या सोशल मीडियावरून शेअर करायची. याचोसोबत ती विविध प्रकचे शूट देखील करत असते. तिच्या या फोटोजना देखील प्रेक्षक भरभरून दाद देतात. सध्या ती तिच्या फिटनेस कडे देखील विशेष लक्ष देताना दिसत आहे. वर्कआऊट चे अनेक फोटोज व्हिडिओज देखील ते तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करत असते. (Marathi Actress)