आजवर मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री ऋता दुर्गुळेने आजवर तिच्या सौंदर्याने भुरळ घातली. सौंदर्याबरोबरचं ऋताच्या अभिनयाचेही लाखो चाहते दिवाने आहेत. कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत ऋताचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘फुलपाखरू’ मालिकेतून ऋता घराघरांत पोहचली. तर ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली. ‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणून ऋताला ओळखले जाते. मराठी चित्रपटांबरोबरचं ऋताने हिंदी सिनेसृष्टीतही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. (Hruta Durgule New webseries)
सोशल मीडियावरही ऋता बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच आता ऋता मराठीनंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या हिंदी वेबसीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं समोर आलं आहे. याबाबतची पोस्ट तिने शेअर केली आहे. ऋता लवकरच कमांडर करण सक्सेना या वेबसीरिज मधून ओटीटी विश्वात आणि हिंदी सिनेविश्वात झळकणार आहे.
हृताने तिच्या नव्या वेबसीरिजचा टिझर शेअर केला आहे. “शेवटी. टीम इंडियासाठी कमांडर करण सक्सेना रिपोर्टिंग”, असं कॅप्शन देत तिने नव्या वेबसीरिज मधून भेटीस येणार असल्याचं सांगितलं आहे. या वेबसीरिजमध्ये गुरमीत चौधरी मुख्य भूमिकेत झळकताना दिसणार आहे. ही वेबसीरिज ८ जुलै रोजी हॉटस्टार या ओटीटी चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.
हृताने या वेबसीरिजमध्ये काम करणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. या वेबसीरिजमध्ये ऋताची नेमकी भूमिका काय असणार हे अद्याप समोर आलेलं नाही. शिवाय ऋताचा वेबसीरिज मधील लूकबद्दलही अद्याप काहीच समोर आलेलं नाही. ऋताच्या या आगामी वेबसीरिजच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. चाहत्यांनीही पोस्टखाली कमेंट करत ऋताला वेबसीरिजमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.