शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

३७व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या, कुजलं होतं संपूर्ण शरीर, कुटुंबियांनी अत्यंसंस्कार करण्यासही दिला नकार कारण…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 10, 2024 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Noor Malabika Death

३७व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या, कुजलं होतं संपूर्ण शरीर, कुटुंबियांनी अत्यंसंस्कार करण्यासही दिला नकार कारण…

काजोलसह ‘द ट्रायल’ या वेबसीरिजमध्ये काम करणारी अभिनेत्री नूर मलाबिका दास हिने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आलं आहे. ३७ वर्षीय अभिनेत्री यापूर्वी कतार एअरवेजमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती. पोलिसांनी ६ जून रोजी लोखंडवाला येथील तिच्या फ्लॅटमधून मृतदेह ताब्यात घेतला. अभिनेत्रीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मात्र अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या अहवालाची अद्याप संपूर्ण बातमी समोर आलेली नाही. (Noor Malabika Death)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी सांगितले की, ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा शेजाऱ्यांना फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी तत्काळ ओशिवरा पोलिस स्थानकात याबाबत माहिती दिली. पथक घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी दरवाजा तोडला आणि आत गेल्यावर पोलिसांना नूरचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेला आढळला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता औषधे, मोबाईल फोन व डायरी जप्त केली.

आणखी वाचा – Video : पापलेट, कोळंबी खेकडे अन्…; नीना कुळकर्णींनी नवऱ्याच्या आठवणीत बनवला खास बेत, माशांवर मारला ताव, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात नेण्यात आला. तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला मात्र कोणीही पुढे आले नाही. परिणामी, शहरातील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या एनजीओच्या मदतीने पोलिसांनी रविवारी, ९ जून रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्तेच्या आईचं निधन, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

नूर मलाबिका ही मूळची आसामची होती. याआधी अभिनेत्रीने अनेक हिंदी चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम केले होते. यामध्ये ‘सिसियान’, ‘वॉकमन’, ‘तिखी चटणी’, ‘जघन्या उपया’, ‘चार्मसुख’, ‘देखी उंडेखी’, ‘बॅकरोड हस्टल’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ती डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित ‘द ट्रायल’ मध्ये काजोल व जिशु सेनगुप्ताबरोबर दिसली होती.

Tags: noor malabikaNoor Malabika Deathnoor malabika passed awaythe trial actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Khulta Kali Khulena fame Actress Mayuri Deshmukh entering once again in the serial Man Dhaga Dhaga Jodte Nava.

'खुलता कळी खुलेना' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुखचं सहा वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, 'स्टार प्रवाह'च्या मालिकेत एन्ट्री

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.