शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हिंदी वेबसीरिजमध्ये ऋता दुर्गुळेची धमाकेदार एन्ट्री, अभिनेत्रीने शेअर केला टीझर, हिंदीतील बड्या कलाकारांबरोबर करणार काम

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 10, 2024 | 5:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hruta Durgule New webseries

हिंदी वेबसीरिजमध्ये ऋता दुर्गुळेची धमाकेदार एन्ट्री, अभिनेत्रीने शेअर केला टीझर, हिंदीतील बड्या कलाकारांबरोबर करणार काम

आजवर मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री ऋता दुर्गुळेने आजवर तिच्या सौंदर्याने भुरळ घातली. सौंदर्याबरोबरचं ऋताच्या अभिनयाचेही लाखो चाहते दिवाने आहेत. कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत ऋताचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘फुलपाखरू’ मालिकेतून ऋता घराघरांत पोहचली. तर ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली. ‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणून ऋताला ओळखले जाते. मराठी चित्रपटांबरोबरचं ऋताने हिंदी सिनेसृष्टीतही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. (Hruta Durgule New webseries)

सोशल मीडियावरही ऋता बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच आता ऋता मराठीनंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या हिंदी वेबसीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं समोर आलं आहे. याबाबतची पोस्ट तिने शेअर केली आहे. ऋता लवकरच कमांडर करण सक्सेना या वेबसीरिज मधून ओटीटी विश्वात आणि हिंदी सिनेविश्वात झळकणार आहे.

आणखी वाचा – ३७व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या, कुजलं होतं संपूर्ण शरीर, कुटुंबियांनी अत्यंसंस्कार करण्यासही दिला नकार कारण…

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

हृताने तिच्या नव्या वेबसीरिजचा टिझर शेअर केला आहे. “शेवटी. टीम इंडियासाठी कमांडर करण सक्सेना रिपोर्टिंग”, असं कॅप्शन देत तिने नव्या वेबसीरिज मधून भेटीस येणार असल्याचं सांगितलं आहे. या वेबसीरिजमध्ये गुरमीत चौधरी मुख्य भूमिकेत झळकताना दिसणार आहे. ही वेबसीरिज ८ जुलै रोजी हॉटस्टार या ओटीटी चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा – मुंबईच्या पहिल्या पावसात मनसोक्त भिजला संकर्षण कऱ्हाडे, स्वतःची काळजी घेण्याचा चाहत्यांनी दिला सल्ला, म्हणाला, “भिजलो…”

हृताने या वेबसीरिजमध्ये काम करणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. या वेबसीरिजमध्ये ऋताची नेमकी भूमिका काय असणार हे अद्याप समोर आलेलं नाही. शिवाय ऋताचा वेबसीरिज मधील लूकबद्दलही अद्याप काहीच समोर आलेलं नाही. ऋताच्या या आगामी वेबसीरिजच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. चाहत्यांनीही पोस्टखाली कमेंट करत ऋताला वेबसीरिजमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Tags: Commander Karan Saxenaentertainmenthruta durgulehruta durgule new moviemarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Paaru Serial Promo

आदित्यची तब्येत खालावली, पारूचा किर्लोस्कर बंगल्यावर येण्यास नकार, अहिल्यादेवींनी तिच्या समोरच लेकाला वाचवण्यासाठी पदर पसरला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.