शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मैत्रिणींसह केली Bride To Be Party, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्यावर प्रेम करणाऱ्या…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 11, 2024 | 12:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Hemal Ingle shared a special video of Bride To Be Party with her friends on social media

मराठी अभिनेत्री हेमल इंगळेने मैत्रिणींबरोबर केली Bride To Be Part, सोशल मीडियावर शेअर केला खास व्हिडीओ

मराठीबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांमधुन आपल्या अभिनयाने सर्वांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे हेमल इंगळे. हेमल इंगळे ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हेमलने एका हिंदी टीव्ही शो आणि एका हिंदी वेब सीरिजमध्येही काम केले आहे. आपल्या निरागस हास्याने व मनमोहक सौंदर्याने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याऱ्या हेमलने काही दिवसांपूर्वी साखरपुडा केला होता आणि आता तिच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यात हेमलचा साखरपुडा झाला होता. बॉयफ्रेंड रोनकबरोबर ती विवाहबंधनात अडकणार आहे. अशातच हेमलने तिच्या Bride To Be Party चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Hemal Ingle Bride To Be Party)

हेमलने तिच्या मैत्रिणींबरोबर ही Bride To Be Party केली असून यावेळी हेमल तिच्या मैत्रीणींबरोबर केक कापताना पाहायला मिळत आहे. हेमल जेव्हा केक कापते तेव्हा तिच्या मैत्रिणी ब्रायडल शॉवर टू यू अस म्हणत जल्लोष करताना दिसत आहेत. हेमलच्या मैत्रिणी तिच्या नावासह फियोन्से फियोन्से अस म्हणतात. यानंतर ती मिस हेमल नाही तर मिसेस हेमल होणार अस म्हणतात. मैत्रिणींबरोबरच्या याच खास सेलिब्रेशनचा व्हिडीओ हेमलणे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे आणि आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Heymal Ingley (@hemalingle)

आणखी वाचा – “कुणाची मनं दुखावली असतील तर…”, सूरज चव्हाणने मागितली माफी, जान्हवी-अंकिता यांचा उल्लेख करत म्हणाला, “यापुढे मी स्वतः …”

हेमलने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनद्वारे असं म्हटलं आहे की, “माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी भरलेली ही खोली आहे हे सर्व हे सगळं जुळवून आणल्याबद्दल तुमचे मनापासून आभार! प्रत्येक क्षण संस्मरणीय होता आणि मी ते आयुष्यभर जपत राहीन! पण आत्तासाठी, मला तुमच्या सर्वांसोबत हा केक कटिंग व्हिडिओ शेअर करायला आवडेल जे माझ्या मैत्रीचा अचूक सारांश देते. मी तुमच्यावर प्रेम करते”.

आणखी वाचा – मित्राच्या मुलीचा जीव धोक्यात, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं मदतीचं आवाहन, पोस्ट व्हायरल

‘अशी ही आशिकी’ या चित्रपटामुळे हेमल इंगळे घराघरांत लोकप्रिय झाली. या चित्रपटात तिने अभिनय बेर्डेबरोबर स्क्रीन शेअर केली होती. अशातच नुकतीच हेमल ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटामुळे चर्चेत आली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये आपल्या होणाऱ्या नवऱ्याला ‘एक्स बॉयफ्रेंड’ म्हणत हेमलने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचा फोटो शेअर होता. हेमलच्या नवऱ्याचं नाव रोनक असं आहे. साखरपुडा झाल्यानंतर अभिनेत्री आता विवाहबंधनात कधी अडकणार? याची चाहते मंडळी वाट पाहत आहेत.

Tags: hemal ingleHemal Ingle Bride To Be Partymarathi actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
rupali ganguly step daughter

आईच वैरी कशी?, सावत्र मुलीचे रुपाली गांगुलीवर सतत गंभीर आरोप, म्हणाली, “तिच्याबरोबर असुरक्षित...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.