अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना?’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. सोशल मीडियावर गौतमी नेहमीच सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. याशिवाय गौतमी चर्चेत असण्याचं कारण म्हणजे देशपांडे सिस्टर्स. देशपांडे सिस्टर्सची प्रेक्षकांमध्येही क्रेझ असलेली पाहायला मिळते. मृण्मयी देशपांडे व गौतमी देशपांडे या दोन बहिणी सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. (Deshpande Sisters Funny Video)
अशातच देशपांडे सिस्टर्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये दोघी बहिणींनी मिळून धुडगूस घातलेला पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये दोन्ही बहिणी एकत्र आलेल्या पाहायला मिळत आहेत. बरं, यावेळी गौतमी व मृण्मयीने एकत्र येत गौतमीचा नवरा स्वानंद तेंडुलकरची शाळा केली आहे. स्वानंदची शाळा करत दोघी बहिणी बेडवर झोपलेल्या दिसत आहेत. आणि स्वानंदला त्यांनी खाली झोपायला लावलं आहे. हा व्हिडीओ शूट करत त्यांनी पोस्ट केला आहे.
आणखी वाचा – “प्रेम, विश्वास काही नसतं…”, दुसऱ्यांदा लग्न मोडल्यानंतर दलजीत कौरची वाईट अवस्था, म्हणाली, “मी आता…”
हा व्हिडीओ शेअर करत, “गप्प खाली झोप”, असं म्हणत टॅगही केलं आहे. तर स्वानंदनेही हा व्हिडीओ रिपोस्ट करत “दृष्ट मेव्हणीचे दृष्ट प्रतिनिधित्त्व”, असं कॅप्शन दिलं आहे. एकूणच पुन्हा एकदा देशपांडे सिस्टर्सने एकत्र येत स्वानंदची मज्जा घेतली आहे. तमी व मृण्मयी या सख्ख्या बहिणी असून दोघांमधील बॉण्डिंग नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं आहे. आजवर दोघींनी सिनेविश्वात एकत्र काम केलं नसलं तरी सोशल मीडियावर त्या बरेचदा एकत्र पाहायला मिळतात. गौतमीला बहुतेकदा मृण्मयी त्रास देतानाचे व्हिडीओ शेअर करते. मात्र आता गौतमी व मृण्मयीने मिळून स्वानंदला त्रास दिला आहे.
अभिनयाशिवाय गौतमी चर्चेत राहिली ते म्हणजे तिच्या लग्नामुळे. कोणतीही पूर्वसूचना वा प्रेमाची जाहीर कबुली न देता गौतमीने थेट मेहंदीचे फोटो शेअर करत लग्नाची खुशखबर दिली. गौतमीने कंटेंट क्रिएटर स्वानंद तेंडुलकरबरोबर लग्नगाठ बांधत त्यांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केलीतर स्वानंद तेंडुलकर हा भाडिपा या मराठी सीरिज व कंटेट बनवणाऱ्या लोकप्रिय युट्यूब चॅनेलसाठी तो व्हाईस प्रेसिडंट म्हणून काम पाहत आहे.