Marathi Actress Famous Mangalsutra: मालिकांचा प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनात मोलाचा वाटा आहे. मालिकेमुळे कलाकार घराघरात पोहचतात.दररोज त्या व्यक्तिरेखा पाहत असल्यामुळे प्रेक्षकांना ती पात्र आपलीशी वाटतात आणि मालिकेतले छोटे छोटे बदल प्रेक्षकांच्या नजरेत येतात. मालिकांमध्ये जेव्हा कलाकारांची लग्न होतात तेव्हा अभिनेत्रींच्या बदलणाऱ्या लूकच प्रेक्षकांना कौतुक असत. अभिनेत्रींच्या साड्या,दागिने ट्रेडींगला असतात त्याचप्रमाणे अभिनेत्रींच्या मंगळसुत्रचा डिझाईन देखील तितकेच प्रसिद्ध होतात.आणि स्त्रियांमध्ये अशा ट्रेंड्सचा क्रेज मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो.असच काही अभिनेत्रीचं मंगळसुत्रचा डिझाईन वायरल झालं.(Marathi Actress Famous Mangalsutra)
पाहा मालिकेतील अभिनेत्रींचे प्रसिद्ध मंगळसूत्राचे डिझाईन (Marathi Actress Famous Mangalsutra)
प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रींनमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरेच नाव आवर्जून घेतलं जातं. चित्रपटांच्या माध्यमातून प्रार्थना बराच काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.पंरतु अनेक वर्षांनी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या माध्यमातून नेहाच्या रूपात छोट्या पडद्यावर प्रार्थनाला प्रेक्षकांना बघता आलं. नेहा,यश व परी या त्रिकोणी कुटुंबाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. नेहाचा लग्ना नंतरचा लूक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला तर नेहाच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.
‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेचा चाहता वर्ग मोठा आहे.अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या जान्हवी या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.जान्हवी व श्रीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.जान्हवीचा “काहीहीहा श्री” हा डायलॉग जितका प्रसिद्ध झाला तितकचं तिच्या मंगळसूत्राचं डिझाईन देखील प्रसिद्ध झालं.मालिकेला इतकी वर्ष होऊनही अजूनही जान्हवीच्या मंगळसूत्राचा क्रेज महिला वर्गात पाहायला मिळतो.
आपल्या सहज सुंदर अभिनयाने ऋताने कायमचं प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. गुणी अभिनेत्रींनमध्ये ऋताच नाव आवर्जून घेतलं. प्रत्येक माध्यमात ऋताने तिच्या कामाची छाप पाडली आहे.’फुलपाखरू’ या मालिकेने ऋताला प्रेक्षकांच विशेष प्रेम मिळवून दिलं.मानस व वैदही मधली केमेस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.लग्नांनंतर वैदेहीचा बदलेला लूक व तीच मंगळसूत्र ट्रेंडिंग मध्ये होतं.
आस्ताद काळे आणि तितीक्षा तावडे यांची ‘सरस्वती’ ही मालिका विशेष गाजली होती. या मालिकेत सरस्वतीच्या गळ्यात सुरुवातीपासून सरस्वती पेंडंट दाखवण्यात आले आहे. ही तिच्या आईची आठवण असते. लग्नानंतर मोठे मालक या चांदीच्या पेंडंटऐवजी सोन्याचे पेंडंट बनवून घेतात, आणि मंगळसूत्र म्हणून तिच्या गळ्यात घालतात. सरस्वतीचं हे मंगळसूत्र चाहत्यांना फार आवडलं होत, ते त्याच्या नवीन डिझाइनच्या पेंडंटमुळे.
सध्या खलनायिका म्हणून धनश्री विशेष ओळखली जाते. ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून शिल्पीच्या भूमिकेत धनश्री प्रेक्षकांच्या भेटीला येते. धनश्रीने साकारलेल्या भूमिकांमधील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील नंदिता वाहिनी ही भूमिका कायम प्रेक्षांच्या लक्षात राहील. या मालिकेतील धनश्रीचा संपूर्ण लूक लक्ष्यवेधी होता. त्यातही वेगळ्या पद्धतीचं मंगळसूत्राने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.
हे देखील वाचा : “इतका घाणेरडा अभिनय…”, ‘गदर २’ पाहिल्यानंतर कोकण हार्टेड गर्लची सनी देओल व अमिषा पटेलवर टीका, म्हणाली, “पाकिस्तानमधून…”
पल्लवी कायम तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकते.सध्या पल्लवीच ‘जरतरची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवरती चांगलंच चर्चेत आहे. परंतु रुंजी या मालिकेतून पल्लवी घराघरात पोहोचली. रुंजी व ऋषीच्या जोडीला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.या मालिकेतील पल्लवीच्या मंगळसूत्राचं डिझाईन वायरल झालं होतं.तेव्हाच नवऱ्याचा नावाच्या डिझाईनचा मंगळसुत्रचा क्रेज महिलांमध्ये पाहायला मिळाला.(marathi celebrity)