‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीच्या शर्यतीतही या मालिकेने स्वतःच स्थान टिकवून ठेवलं आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेमुळेच जुई घराघरांत पोहोचली आहे. (Jui Gadkari Post)
अभिनेत्री जुई गडकरी ही तिच्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची लाडकी आहे. याशिवाय ती तिच्या लाघवी, संस्कारी स्वभावामुळे सगळ्यांच्या मनात घर करून आहे. सोशल मीडियावरही जुई बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आस्क मी एनिथिंग सारखी पोस्ट शेअर करुन ती चाहत्यांसह चर्चाही करते. अशातच अभिनेत्रीच्या आणखी एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जुईने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन फिरायला गेली असल्याची पोस्ट शेअर केली आहे. जुई मालिकेच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून फिरायला गेली आहे. जुई तिच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून उज्जैन, इंदौर येथे गेली आहे. तिथे तिने महाकालेश्वराचं दर्शन घेतलं आहे. तिथले काही फोटोही तिने शेअर केले आहेत.
फिरायला गेली असताना जुईने साडी नेसून आणखीही काही देवस्थानांना भेट दिली असल्याचं पाहायला मिळत आहे. महाकाल, ओमकारेश्वर, मामलेश्वर, मंगलनाथ, कालभैरव, नवग्रह, सांदीपनी आश्रम, खजराना, राजबाडा या ठिकाणांना भेट देत जुईने आशीर्वाद घेतले. या फोटोंमध्ये तिच्या कपाळी महाकाल असं लिहिलेलं दिसतंय तर एका फोटोत तिच्या कपाळी टिळा लावलेला दिसतोय.