अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनला बॉलिवूडमधील कलाकार मंडळी पोहोचले आहेत. सलमान खान, जान्हवी कपूर-बोनी कपूर, आलिया भट्ट-रणबीर कपूर, रणवीर सिंग, करीना कपूर, करिश्मा कपूर, करण जोहर, रितेश-जेनेलिया देशमुख व दिशा पटानी यांचा या कलाकारांमध्ये समावेश आहे. मुकेश व नीता अंबानी यांचा धाकटा लेक व सूनेच्या या प्री-वेडिंग फंक्शनसाठी दररोज वेगळ्या थीमवर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. इतकंच नाही तर जामनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रमाणेच यावेळीही प्री-वेडिंगमध्ये आंतरराष्ट्रीय गायकांची धमाल पाहायला मिळणार आहे. (Anant ambani and radhika merchant Pre Wedding)
आंतरराष्ट्रीय गायक पिटबुल अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करणार आहेत. डोंट स्टॉप द पार्टी, फायरबॉल, गिव्ह मी एव्हरीथिंग आणि इंटरनॅशनल लव्ह या गाण्यांसाठी पिटबुल प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त, केटी पेरी देखील परफॉर्म करणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आमंत्रणानुसार, क्रूझ काल रोम येथे पोहोचले आणि पाहुण्यांनी दिवसभर रोमन सुट्टीचा आनंद लुटला. यानंतर स्टाररी नाईट थीमवर पार्टी झाली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये या पार्टीत प्रसिद्ध बॅकस्ट्रीट बॉईज बँडने परफॉर्म केल्याचे बोलले जात आहे. तसेच, करीना कपूरचा मास्कमधील फोटोही व्हायरल होत आहे.
आकाश अंबानी व श्लोका मेहता यांची मुलगी वेदाचा वाढदिवस आज क्रूझवर साजरा होणार आहे. संध्याकाळपर्यंत क्रूझ फ्रान्समधील सर्वात ग्लॅमरस शहरांपैकी एक असलेल्या कान्सला पोहोचेल. चित्रपट महोत्सवाव्यतिरिक्त, कान्स लक्झरी हॉटेल्स, सुंदर समुद्रकिनारे, थिएटर-संग्रहालये आणि प्रेक्षणीय पार्ट्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. क्रूझमधून उतरल्यानंतर संध्याकाळी येथे पार्टी होईल. या पार्टीची थीम Le Masquerade अशी ठेवण्यात आली आहे. या पार्टीचा ड्रेस कोडही ब्लॅक द मास्करेड असा ठेवण्यात आला आहे. मध्यरात्रीपर्यंत ही पार्टी सुरु राहणार आहे. .
‘डीएनए’ मधील अहवालात असे सूचित होते की, शकीरा लग्नाआधीच्या दिवसभराच्या उत्सवादरम्यान एका लक्झरी फ्रेंच क्रूझ जहाजावर देखील परफॉर्म करेल. ‘वाका वाका’ या हिट गाण्याचा शो सादर करणार असल्याचं तिच्याकडून अपेक्षित आहे. यासाठी शकीरा १० कोटी ते १५ कोटी रुपये फी घेत असल्याची माहिती आहे. ‘द सन यूके’च्या वृत्तानुसार, कॅटी पेरीला ‘ले मास्करेड’मध्ये परफॉर्मन्ससाठी अंबानी कुटुंबाकडून लाखो डॉलरचा चेक मिळाला आहे. कॅटी खासगी कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्यासाठी १२ ते १६ कोटी मानधन घेते. त्यानुसार तिला अंबानींकडून मानधन मिळाल्याचं म्हटलं जात आहे.