शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आई मला सोडून गेली आणि…”, कान्समध्ये आईची साडी व नथ घालण्यावरुन छाया कदमांनी सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाल्या, “आजारपणात ती…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 31, 2024 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Chhaya Kadam On Cannes Film Festival

"आई मला सोडून गेली आणि...", कान्समध्ये आईची साडी व नथ घालण्यावरुन छाया कदमांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाल्या, "आजारपणात ती..."

सध्या सर्वत्र कान्स फिल्म फेस्टिव्हलची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या कान्स महोत्सवात भारताने बाजी मारली म्हणून सर्वत्र याचा बोलबाला सुरु असलेला पाहायला मिळत आहे. यंदा कान्सच्या महोत्सवात एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या चित्रपटाचं भरभरुन कौतुक करण्यात आलं त्यामुळे ही अभिनेत्री सध्या विशेष चर्चेत आहे. ही अभिनेत्री म्हणजे छाया कदम. आजवर छाया कदम यांनी त्यांच्या अभिनयाने सिनेसृष्टीत आपली छाप पाडली आहे. छाया कदम यांच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाचा कान्समध्ये गौरव करण्यात आला. (Chhaya Kadam On Cannes Film Festival)

या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आईची साडी, नथ, केसात गजरा आणि कपाळावर टिकली असा मराठमोळा लूक करुन गेलेल्या छाया कदम चर्चेत आल्या. आईच्या साडीच्या पेहरावाबद्दल छाया यांनी नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. कान्सहून भारतात परतल्यानंतर छाया यांनी पहिली मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “माझा आईवर खूप जीव होता. आई हे माझं बाळ होतं. मी सगळ्या गोष्टी आईसाठी केल्या पण विमानप्रवास तिचा मला घडवून आणता आला नाही.

आणखी वाचा – पारू व आदित्यच्या लग्नाचं सत्य येणार का अहिल्यादेवींसमोर?, पारू गळ्यातील मंगळसूत्र लपवून ठेवू शकेल का?, काय घडणार?

View this post on Instagram

A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)

पुढे त्या म्हणाल्या, “माझी आई गावी राहत होती. शेवटी येताना मी तिला सांगितलं होतं, तू थोडी तरतरीत राहा. माझा भाचा दहावीत होता. त्यामुळे मेमध्ये त्याची परीक्षा झाली की मग विमानाने प्रवास करायचा असं मी तिला सांगून आले. पण ते शक्य झालं नाही. आणि ती साडी माझ्या मैत्रिणीने माझ्या आईला भेट म्हणून दिली होती. त्या साडीच असं होतं की, गावी ती साडी घेऊन गेले तेव्हा आई आजरपणामुळेसाडी नेसायला कंटाळा करायची. म्हणून दिवाळीत आई मुंबईत येणार म्हणून ती साडी मी मुंबईत आणली. पण त्यावेळीही ती साडी आईला नेसवणं राहून गेलं. त्या साडीने मुंबई ते गांव असा अनेकदा प्रवास केला. आणि आईची ती साडी नेसायची इच्छा राहून गेली. त्यानंतर आई गेली”.

आणखी वाचा – लग्नानंतर ‘पारू’ खऱ्या आयुष्यात घालत असलेलं मंगळसूत्र पाहिलंत का?, मॉडर्न टच व युनिक डिझाइनने वेधलं लक्ष, चाहत्यांचीही पसंती

“मग माझ्या मनात सतत येत राहायचं की, आईचा विमानप्रवासही राहिला आणि आईला ती साडी नेसवायचीही राहिली. जेव्हा कान्सचं समोर आलं तेव्हा माझ्या मनात आलं की, आईला हा असा प्रवास घडवून आणायचा. आणि ताईच्या लग्नावेळेची आईची नथ होती ती मी घातली होती. ती साडी आणि नथ घालून मी पूर्ण कान्स खूप फिरले. आणि तिथल्या लोकांना ते फार कौतुकास्पद वाटलं”, असंही त्या म्हणाल्या.

Tags: cannes film festivalchhaya kadamChhaya Kadam On Cannes Film Festivalentertainmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Sayaji shinde talk about sindoor operation
Entertainment

“मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं”, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवर सयाजी शिंदेंचं मोठं वक्तव्य, नक्की काय म्हणाले?

मे 8, 2025 | 3:06 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update Netra got the weapon to kill Virochka

देवीआईच्या लेकींच्या हाती पाचवी पेटी, पेटीमध्ये विरोचकाला मारण्याचे 'ते' शस्त्र, अखेर रुपालीचा अंत होणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.