बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तरुणाईला लाजवेल असा नारकर कपलचा डान्स व्हिडीओ व्हायरल, ट्रोल नव्हे तर नेटकऱ्यांनी केलं भरभरुन कौतुक, दोघांची एनर्जी पाहून म्हणाले…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 5, 2024 | 11:28 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
narkar couple dance video

तरुणाईला लाजवेल असा नारकर कपलचा डान्स व्हिडीओ व्हायरल, ट्रोल नव्हे तर नेटकऱ्यांनी केलं भरभरुन कौतुक, दोघांची एनर्जी पाहून म्हणाले...

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेता अविनाश नारकर. ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी आजवर त्यांच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. वयाची पन्नाशी ओलांडलेलं हे जोडपं नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. सोशल मीडियावरही ही जोडी बऱ्यापैकी सक्रिय असलेली पाहायला मिळते. ट्रेंडिंग रील व्हिडीओ शेअर करत ते नेहमीच चर्चेत असतात. ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवण्यात ही जोडी कधीच मागे नसते. त्यामुळे सोशल मीडियावर या नारकर कपलची हवा असलेली पाहायला मिळते. (Aishwarya Narkar And Avinash Narkar)

अशातच ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी नुकताच एक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी नाम मनसु या दाक्षिणात्य गाण्यावर थिरकताना दिसतात. हटके डान्स स्टेप्स करत दोघांनी त्यांची एनर्जी वापरून केलेला डान्स साऱ्यांचं लक्ष वेधलं. “आम्ही ट्रेंड फॉलो करत आठवणी गोळा करतोय,” असं सुंदर कॅप्शन ऐश्वर्या नारकर यांनी या व्हिडीओला दिलं आहे. ऐश्वर्या आणि अविनाश यांची एनर्जी ही तरुणाईला लाजवेल अशी आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

आणखी वाचा – “नाटक सुरु असताना समोर पडलेला आंबा उचलला अन्…”, वंदना गुप्तेंची दिग्दर्शकांनी केली खरडपट्टी, म्हणाल्या, “ते ओरडत होते तोपर्यंत…”

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

नारकर दाम्पत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शविली आहे. “प्रत्येक क्षण आनंदात कसा जगावा हे तुमच्याकडे पाहून शिकावे”, “अविनाश सर डान्स करताना खूप मज्जा करतात”, “किती आनंद लुटता तुम्ही जीवनाचा”, “असा माणूस पाहिजे जो जीवनाचा आनंद पुरेपूर लुटतो”, असं म्हणत दोघांच्या एनर्जीच कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – “मराठीमध्ये खूप लवकर कळेल…”, सई लोकूरने लेकीला इंग्रजी भाषेत कविता शिकवताच नेटकऱ्याचा सल्ला, अभिनेत्री म्हणाली, “जितक्या जास्त भाषा…”

ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत त्या रुपाली म्हात्रे ही भूमिका साकारताना दिसत आहेत. ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.

Tags: aishwarya narkaraishwarya narkar and avinash narkaravinash narkar danceentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
deepika padukone on prakash padukone

माधुरी दीक्षितच्या लग्नानंतर दीपिका पदुकोणच्या वडिलांची झाली होती वाईट अवस्था, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “त्यांनी स्वतःला बाथरुममध्ये…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.