‘आई कुठे काय करते’ मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. मध्यंतरी मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांचा हिरमोड केला होता. मात्र आता पुन्हा एकदा मालिकेच्या नव्या प्रवासाने प्रेक्षकवर्गावर छाप पाडली आहे. मालिकेत सध्या अरुंधतीवर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हेतर आशुतोषच्या मृत्यूनंतर सुलेखा ताईंनी अरुंधतीला बाहेरचा रास्ता दाखवला. यावेळी कांचन आजी मात्र अरुंधतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. (Aai Kuthe Kay Karte Promo)
अरुंधतीचा स्वतःला सावरण्याचा प्रवास सध्या मालिकेत सुरु असलेला पाहायला मिळत आहे. मात्र अरुंधती देशमुखांच्या घरी राहायला आली असल्याचं संजनाला खटकलेलं आहे. अरुंधती घरी आल्या दिवसापासून संजनाच्या मनात नकारात्मकता आली आहे. ही गोष्ट कांचनच्या नजरेतून सुटलेली नसते. कांचन संजनाच्या हालचालींवर लक्ष ठेवून असते. अशातच मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये कांचन संजनाचा सर्वांसमोर पाणउतारा करताना दिसत आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये, मालिकेत होळीनिमित्त तयारी सुरु असते. तेव्हा सगळेचजण काही ना काही काम करत असतात. अरुंधतीही रांगोळी काढत असते. अरुंधतील रांगोळी काढताना पाण्याचा ग्लासाला संजनाचा धक्का लागून ती रांगोळी खराब होते. हे पाहून कांचन संजनावर भडकतात. संजनाला त्या जाब विचारतात की, “तू हे सर्व मुद्दाम करत आहेस. अरुंधती घरी राहायला आली तेव्हापासून तुझं नाटक मी पाहत आहे”. हे ऐकून अरुंधतीलाही वाईट वाटतं.
अरुंधतीने काढलेली रांगोळी विस्कटायचं कारण काय होतं? असा प्रश्न कांचन संजनाला विचारते. हे ऐकून संजना, “मी मुद्दाम नाही केलं असं म्हणते, तुम्हाला काहीतरी कारण काढून मला या घरातून बाहेर काढायचं आहे. म्हणजे मी या घरातून गेली तर तुम्हाला अनिरुद्ध आणि अरुंधतीला पुन्हा एकत्र आणता येईल”, हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित होतात. आता संजनाच्या या टोकाच्या बोलण्याने अरुंधतीवर काही परिणाम होणार का?, अरुंधती देशमुखांचं घर सोडून जाणार का? हे पाहणं रंजक ठरेल.