शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मोठं स्वयंपाकघर, हॉल, घरासमोर बाग अन्…; परदेशात इतकं आलिशान व अगदी मोठं आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं घर, पाहा Inside Video

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 5, 2024 | 7:32 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Ashvini Bhave's home

मोठं स्वयंपाकघर, हॉल, घरासमोर बाग अन्...; परदेशात इतकं आलिशान व अगदी मोठं आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं घर, पाहा Inside Video

हिंदीसह मराठी सिनेसृष्टीतला एकेकाळचा मराठमोळा ग्लॅमरस चेहरा म्हणजे अभिनेत्री अश्विनी भावे. ‘अशीही बनवा बनवी’ या आयकॉनिक मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटात त्यांनी परिधान केलेली लिंबू कलरची साडी तुफान गाजली. अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांना नेहमीच मोहित केलं आहे. मराठीच नाही तर, हिंदी आणि कन्नड मनोरंजन विश्वातही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची जादू दाखवली आहे.

मनोरंजनविश्वात त्या आजही सक्रिय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियावर त्या त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. अश्विनी भावे यांनी किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केले आणि त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यांच्या मुलांचे बालपण शिक्षणही अमेरिकेतच गेलं. 

View this post on Instagram

A post shared by Ashvini Bhave (@ashvinibhave)

अश्विनी भावे सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटो व व्हिडीओमधून त्यांच्या परदेशातील घराची खास झलकही पाहायला मिळते. आकर्षक वस्तूंनी अभिनेत्रीचे घर सजलेले पाहायला मिळत आहे. ऑफ व्हाईट रंगाने अश्विनी यांचे घर रंगवलेले आही फोटोंमधून पाहायला मिळत आहे. अश्विनी यांच्या अमेरिकेतल्या घराच्या आजूबाजूला सुंदर बगिचा असून या बगिच्यामध्ये त्या शेतीही करतात.

आणखी वाचा – अधिपती व अक्षराच्या नात्यात फुट पाडणार गाणं शिकवणारी मास्तरीणबाई?, भुनवेश्वरीसह रचणार नवं कटकारस्थान, परत घरात येणार का?

अश्विनीने तिच्या अमेरिकेतील घराभोवती सुंदर फुलांची तसेच फळभाज्यांची बाग फुलवली आहे. त्यांच्या प्रशस्त घराबरोबरच त्यांच्या घरातील स्वयंपाकघरही अगदी प्रशस्त आहे. मोठा हॉल, मोठे किचन व आकर्षक बेडरूम्सने अश्विनी भावे यांचे घर सजलेले आहे.

आणखी वाचा – घटस्फोटानंतर संजीदा शेख व आमिर अलीची एकमेकांवर चिखलफेक, १२ वर्ष संसार केल्यानंतर एकमेकांना वैतागले कारण…; म्हणाला, “खूप वाईट…”

दरम्यान, अश्विनी भावे यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी ‘अशीही बनवाबनवी’, ‘वजीर’, ‘कळत नकळत’, ‘ध्यानीमनी’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘सरकारनामा’, ‘सगळे सारखेच’, ‘एक रात्र मंतरलेली’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांत काम केले आहे. तर हिंदीत ‘सैनिक’, ‘हेना’, ‘बंधन’, ‘चित्ता’, ‘तेरी महोब्बत के नाम’ यांसारख्या चित्रपटातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Tags: ashvini bhavemarathi actressmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
06 June 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

वृषभ, कन्या, तूळ राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस भाग्याचा, महत्त्वाचे कामे पूर्ण होणार, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.