शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घटस्फोटानंतर संजीदा शेख व आमिर अलीची एकमेकांवर चिखलफेक, १२ वर्ष संसार केल्यानंतर एकमेकांना वैतागले कारण…; म्हणाला, “खूप वाईट…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 5, 2024 | 4:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aamir Ali reacted to ex wife Sanjeeda Shaikh's statement about her divorce

घटस्फोटानंतर संजीदा शेख व आमिर अलीची एकमेकांवर चिखलफेक, १२ वर्ष संसार केल्यानंतर एकमेकांना वैतागले कारण…; म्हणाला, "खूप वाईट…"

सध्या सर्वत्र ओटीटीवर ‘हिरामंडी’ या सीरिजची चांगलीच चर्चा सुरु आहे. या सीरिजला सध्या सर्वत्र चांगलाच प्रतिसाद मिळत असून या सीरिजमधील अभिनेत्रींचीही बरीच चर्चा रंगताना दिसत आहे. या सीरिजमध्ये वहिदा ही भूमिका साकारत असलेली संजीदा खान हीदेखील या सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नुकतेच संजीदा शेखने एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केले होते. यावेळी “घटस्फोटानंतर ती स्वतःला भाग्यवान समजत आहे. आपले हृदय तोडणाऱ्या आणि बदनामी करणाऱ्या जोडीदारापासून अंतर राखणे चांगले आहे”, असे म्हटले होते.

अभिनेत्रीच्या या व्यक्तव्यानंतर तिचा पूर्वाश्रमीचा पती आमिर अलीने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी आमीर अली म्हणाला की, “कुणाचाही अपमान करणाऱ्यातला मी नाही. मी व संजीदा आम्ही पाच वर्षांपासून एकत्र नाही. त्यामुळे संजीदा शेख कदाचित घटस्फोटानंतर आयुष्यात घडलेल्या इतर घटनेबद्दल बोलत असावी”.

View this post on Instagram

A post shared by Sanjeeda Shaikh (@iamsanjeeda)

आमिर अलीने ‘न्यूज18’ला सांगितले की, “ती आणि मी एकमेकांबद्दल जे काही बोलतो ते आम्हा दोघांबद्दलच असेल असे नाही. आता जवळपास पाच वर्षे आम्ही एकत्र नाही आहोत. लग्न मोडणे आणि घटस्फोटानंतर मी खूप वाईट काळातून गेला होतो. त्यामुळे आता मी याबद्दल फार काही बोलू इच्छित नाही”. 

आणखी वाचा – “लोकशाहीचा विजय झाला”, निवडणूकांच्या निकालांनंतर मराठी कलाकारांचं राजकीय मुद्द्यावर भाष्य, म्हणाले, “कुठलाही राजकीय पक्ष…”

यापुढे त्याने असं म्हटलं की, “संजीदा शेखबरोबरचे माझे नाते ही खूप जुनी गोष्ट आहे. जी आता संपली आहे. आम्ही विभक्त होण्याच्या त्या काळात मी कोणत्या परिस्थितीतून गेलो आणि माझ्याबरोबर काय घडले? हे मला माहीत आहे. पण त्याबद्दल मला आता कुणावर चिखलफेक किंवा टीका करायची नाही. विशेषतः ज्यांच्याशी माझे नाते आहे”.

आणखी वाचा – अधिपती व अक्षराच्या नात्यात फुट पाडणार गाणं शिकवणारी मास्तरीणबाई?, भुनवेश्वरीसह रचणार नवं कटकारस्थान, परत घरात येणार का?

दरम्यान, आमिर अली आणि संजीदा शेख हे एकेकाळी टीव्हीच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले, पण २०२२ मध्ये घटस्फोट झाला. त्याला एक मुलगीही आहे. अभिनेत्रीने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या व आमिर अलीबद्दलच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केले होते.

Tags: Aamir AliAamir Ali Sanjeeda Sheikh Divorce Newsbollywood newsSanjeeda Sheikh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Priyanka Chopra Brother In Law Joe Jonas

तीन लग्न, तीन मुलं, नातवंड तरीही ६१वर्षीय अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या दीराच्या प्रेमात, बायकोपासून वेगळं राहिल्यानंतर जवळीक अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.