मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मराठीसह तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही अभिनयाची जादू दाखविली. सोशल मीडियावरही अमृता नेहमीच सक्रिय असते. नेहमीच काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अमृताच्या ग्लॅमरस लूकचे लाखो चाहते दिवाने आहेत. असं असलं तरी अमृता बरेचदा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसते. बरेचदा ती या ट्रोलिंगवर भाष्य करताना ही दिसली आहे. (Amruta Khanvilkar On Husband)
अमृता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बरेचदा चर्चेत राहिली आहे. हिमांशू मल्होत्रासह तिने लग्नगाठ बांधली आहे. मात्र नवऱ्याबरोबरचे फारसे फोटो ती सोशल मीडियावरुन शेअर करत नाही यावर तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. हिमांशुबरोबरचे फोटो पोस्ट करत नाही यावर अमृताने ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना अमृता म्हणाली, “मला वाटते आमचे चाहते हे आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. काही लोकांना तुम्ही आवडता आणि काही लोकांना तुम्ही आवडत नाही. जोपर्यंत ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळा-ढवळ करत नाही तोपर्यंत सगळं काही ठीक असतं”.
“माझं काम आणि मी इन्स्टाग्रामवर काय शेअर करते ते काहीवेळा त्यांना आवडते, पण जेव्हा ते मला आणि माझ्या कुटुंबाला किंवा हिमांशूला ट्रोल करायला लागतात ते मला आवडत नाही. त्यामुळे मी त्याच्याबद्दल खूप काही पोस्ट करत नाही. कारण मी त्याला सुरक्षित ठेवू इच्छिते. माझ्यासाठी तो बाहेर असण्यापेक्षा त्याचे रक्षण करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याचं कारण म्हणजे तो या इंडस्ट्रीतून नाही. कोणत्या प्रकारे होणाऱ्या ट्रोलिंगला आणि द्वेषासाठी तो पात्र नाही, कारण या सगळ्यामुळे त्याला दु:ख होऊ शकतं. मी नेहमीच याची काळजी घेतली, घेते आणि घेत राहीन”.
पुढे म्हणाली, “माझे व हिमांशुचे बरेच फोटो सोशल मीडियावर न टाकल्यामुळे मला ट्रोल करण्यात आले आहे. पण मी माझ्या आई- वडिलांना पाहते, जे गेल्या ४५ वर्षांपासून निरोगी, आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. त्या दोघांचे फेसबूक किंवा इन्स्टाग्रामवर एकही फोटो नाही. मला तेच करायचं आहे. मी जुन्या विचारसरणीची आहे. मी व हिमांशू एकमेकांना तेव्हा पासून ओळखतो, जेव्हा इन्स्टाग्राम नव्हतं. २००४ पासून एकमेकांना आम्ही ओळखत आहोत, तेव्हा आम्ही कॅमेऱ्यात फोटो काढायचो. आम्हाला एकमेकांना सुरक्षित ठेवायचं आहे आणि एकमेकांची ओळख जपायची आहे”. एक प्रादेशिक अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीमध्ये प्रतिनिधित्वाची कमतरता जाणवली की नाही याबद्दलही अमृताने खुलासा केला आणि म्हणाली, “सर्व रेषा किंवा क्षेत्र अस्पष्ट आहेत. आज अनेक प्रादेशिक अभिनेते, अभिनेत्री व दिग्दर्शक इतके चांगले काम करत आहेत. टॅलेंटनुसार तुम्ही कोणती दिशा निवडता याला अधिक महत्त्व आहे”.