आपल्या अभिनयाने व नृत्याने मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. आपल्या अभिनयाने अमृताने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच अमृता नृत्यातही पारंगत आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी अमृता खानविलकर नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. सोशल मीडियावर ती आपले अनेक स्टायलिश फोटो किंवा डान्स रील शेअर करत असते. आशातच तिने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Amruta Khanvilkar Injury)
अभिनेत्रीच्या हाताला दुखापत झाली असून या दुखापतीबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अमृताने सोशल मीडियावर दोन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये पहिल्या फोटोत अमृताने हाताला सूज आल्याचा फोटो तिने दाखवला आहे, तर दुसऱ्या फोटोत अमृताच्या हाताला पट्टी बांधली आहे. अमृताच्या हाताला दुखापत झाली असून त्याला सूज आली आहे. त्यामुळे अमृताने हाताला पट्टी बांधली आहे. अमृताने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “अजूनही यातून रिकव्हर होत आहे. तुम्ही जे पाहत आहात आणि तुम्ही जे पाहू शकत नाही. फक्त पुढे चालत राहा”.
आणखी वाचा – फ्रॅक्चर असतानाही अशोक सराफांनी केलं शुटींग, निवेदिता यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाल्या, “ते पडले आणि…”
या पोस्टच्या कॅप्शनवरुन अमृताला दुखापत झाली असली तरी तिने तिच्या कामात कोणताही खंड पडू दिला नाही, हे दिसत आहे. आता अभिनेत्रीला ही दुखापत नेमकी कशामुळे झाली आहे? याबद्दल काही कळले नसले तरी अनेकांनी तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. अमृताच्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्स करत तिला काळजी घेण्यास सांगितले आहे.
आणखी वाचा – गुलाबाची कळी हळदीने माखली! शोभिता धुलिपालाला लागली नागा चैतन्यच्या नावाची हळद, फोटो व्हायरल
ती रेडकर, प्रार्थना बेहेरे, सुखदा खांडकेकर, भार्गवी चिरमुले, नंदिता धुरी यांसह अनेकांनी तिला कळजी घेण्यास सांगितले आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिचा आणि अमेय वाघ यांची मुख्य भूमिका असलेला लाइक आणि सबस्क्राईब हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. तर नुकत्याच प्रदसरीत झालेल्या ‘धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज’ या चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.