शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्याबद्दल चुकीची माहिती देत…”, बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर भडकली अमृता देशमुख, म्हणाली, “बिनडोक रेवा…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 30, 2025 | 1:34 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Amruta Deshmukh on troller

चुकीची माहिती पसरवणाऱ्या व्यक्तीबद्दल अमृता देशमुखने व्यक्त केला राग, शेअर केली विशेष सोशल मीडिया पोस्ट

कलाकार म्हटलं की, चाहत्यांचे कौतुक, प्रेम हे आलंच. पण अनेकदा या कलाकारांना सोशल मीडियावरील ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. सोशल मीडियाच्या अधिकच्या वापरामुळे कलाकारांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. आपल्या आवडत्या कलाकारांवरील प्रेमाबद्दल अनेक चाहते मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. ट्रोलर्स कलाकारांची बदनामी करतानाची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. काही कलाकार सोशल मीडियावरील या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. पण काही कलाकार मात्र या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतात. ट्रोलर्सना न जुमानता त्यांना सडेतोड उत्तर देणारे अनेक मराठी कलाकार आहेत. यात आता अमृता देशमुखचीही भर पडली आहे. (Amruta Deshmukh on troller)

अभिनेत्री अमृता देशमुखने नुकतंच एका ट्रोलर्सला धारेवर धरलं आहे. अमृता ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे व प्रसादबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर अभिनेत्रीचे युट्यूब चॅनेलदेखील आहे. यावरील काही गंमती-जंमतीही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अमृता सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तिच्या चाहत्यांकडूनदेखील तितकंच प्रेम मिळतं. मात्र नुकतंच एका सोशल मीडिया वापरकर्त्याने अमृताबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे आणि याबद्दल तिने सोशल मीडियावर तक्रार केली आहे.

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : रंग प्रेमाचा! अखेर एजेंनी लीलाला दिली प्रेमाची कबुली, नात्यात नवी सुरुवात

अमृताने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. ‘बिनडोक रेवा’ असं म्हणत तिने तिची बदनामी करणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे आणि पुढे असं म्हटलं आहे की, “जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल किंवा माझ्यावर थोडेसे जरी प्रेम असेल तर या व्यक्तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला रिपोर्ट करा. ही/हा माझ्या आणि माझ्या जवळच्या लोकांबद्दल चुकीची माहिती आणि द्वेष पसरवत आहे”.

आणखी वाचा – “जर अभिनेत्रीच्या पोटाला मी चिमटा काढला असता तर…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, इतर कलाकारांचं नाव न घेता म्हणाला…

दरम्यान, अनेक मालिकांमधून दिसणारी अमृता देशमुख सध्या तिच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. अमृता देशमुख सध्या संकर्षण कऱ्हाडेबरोबर ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. सध्या या नाटकाचे जोरदार प्रयोग महाराष्ट्रभर सुरु आहेत. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Tags: amruta deshmukhAmruta Deshmukh on trollermarathi actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Next Post
Aishwary Thackeray Bollywood debut

बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरेचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, अनुराग कश्यपबरोबर चित्रपट करणार, मोठी घोषणा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.