Alka Kubal On Atrocity : सध्या समाजात घडणाऱ्या घडामोडींकडे अत्याचार हा शब्द अधिकवेळा कानी येतो. महिलांवरील अत्याचार हे प्रामुख्याने प्रमाण वाढलेलं दिसत आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात हा प्रकार सातत्याने होताना दिसत आहे. महिलांवर होणारे अमानुष अत्याचार, खून, अत्याचार, विनयभंग, बलात्कार, बालहत्या,आणि घरगुती हिंसाचार या घटनांचा यांत समावेश आहे. बरेचदा यावर दिग्गज मंडळी, अधिकारी वाचा फोडतात. महिलांवरील हिंसा ही जगभरातील एक गंभीर आणि व्यापक समस्या आहे. यावर सुरुवातीच्या काळात महिलांनी धैर्य दाखवत वाचा फोडली नाही म्हणून हे प्रमाण अधिक वाढले. मात्र आता महिला धिटाने या प्रसंगांना तोंड देत आवाज उठवताना दिसत आहेत, मात्र त्यामानाने हे प्रमाण कमीच आहे.
महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराबाबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना भाष्य केलं. सध्याच्या सतत समोर येणाऱ्या घटनांवर अलका यांनी भाष्य करत म्हटलं की, “आपण फक्त पोलिसांना दोष देतो. पण याला आजूबाजूचे लोकही जबाबदार आहेत. या घटना घरातून घडतात, गेल्या महिन्यात एक बातमी समोर आली एक वडील घरातच चार मुलींवर अत्याचार करत होते. मला असं वाटत त्या चार मुलींनी मिळून आपल्या बापाचा खून करायला हवा होता. खूण करणं हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही हे मलाही माहित आहे. पण जो नालायक बाप आपल्या मुलींवर सतत बलात्कार करतो, अशा बापाला का सोडायचं?. स्वतःच्या मुलींचा तो वापर करतो असा दगडाचं काळीज असणारा हा बाप का हवा?”.
पुढे त्या म्हणाल्या, “आपल्या देशात कायद्याची शिक्षा कडक असायला हवी. चार वर्ष आत जाणार आणि नंतर बाहेर येणार याला काहीच अर्थ नाही. आपल्या इथं सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या कडक शिक्षेप्रमाणे शिक्षा व्हायला हवी. कायद्याची भीती प्रत्येकाला असायला हवी. जेव्हा आजूबाजूचे लोक, महिला या घटना घडताना पाहतात आणि आपला काय याच्याशी संबंध असं म्हणून बाजूला होतात हे करणं टाळलं पाहिजे”.
आणखी वाचा – ड्रेस-साडी विकते, मुंबई सोडली, लेकीला घेऊन…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची वाईट अवस्था, घटस्फोटानंतरची परिस्थिती…
एकत्र कुटुंब आणि संस्काराबाबत बोलताना अलका म्हणाल्या, “माझ्या करिअरमध्ये माझे सासू-सासरे माझ्या पाठीशी नसते तर मी कधीच इतकी यशस्वी अभिनेत्री झाले नसते. त्यांनी मला अभिनय करण्याची संधी दिली आणि माझं घर, माझ्या मुलांना सांभाळलं. माझ्या मुलांवर त्यांचे संस्कार आहेत. ते होते म्हणून निश्चिन्त बाहेर पडू शकले. आजकाल एकत्र कुटुंब वा सासू सासरे नको असतात, त्यांना स्वातंत्र्य हवं असतं, तर असं करू नका ते स्वातंत्र्य आपल्याला मिळतंच. आपण जर त्यांना पाच टक्के प्रेम दिलं तर त्यांच्याकडून आपल्याला १०० टक्के प्रेम मिळतं, हा माझ्या वैयक्तिक अनुभव आहे”.