शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“या वयात शोभतं का?”, बॅकलेस फोटोशूटवरुन ऐश्वर्या नारकर ट्रोल, तर चाहत्यांनी घेतली बाजू, म्हणाले, “हिंदी अभिनेत्रींवर फिदा होता…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 2, 2025 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya narkar Troll

"या वयात शोभतं का?", बॅकलेस फोटोशूटवरुन ऐश्वर्या नारकर ट्रोल, तर चाहत्यांनी घेतली बाजू, म्हणाले, "हिंदी अभिनेत्रींवर फिदा होता…"

Aishwarya narkar Troll : कलाकार म्हटलं की, कौतुकाबरोबर ट्रोलिंगदेखील आलंच. काही कलाकार सोशल मीडियावरील या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. पण काही कलाकार मात्र या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतात. यापैकीच एक नाव म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंग रील शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात आणि यावर त्यांना होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलही भाष्य करत असतात. असं असलं तरी त्यांनी काही त्यांचे डान्स व्हिडीओ, हटके फोटोशूट करायचं सोडलं नाही. नेहमीच त्या त्यांच्या हटके फोटोशूटने रसिकांच्या मनावर राज्य करतात. अशातच ऐश्वर्या यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एक बोल्ड फोटोशूटची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

इन्स्टाग्रामवर त्यांनी नुकतेच काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्या बॅकलेस टॉप आणि पँट घालून पोज देताना दिसत आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया दोन गटांत असल्याचं दिसत आहे. काहींनी त्यांच्या लूकचं कौतुक केलं, तर काहींनी त्यांना हे फोटोशूट पाहून ट्रोल केलं आहे. ऐश्वर्या नारकर आणि त्यांचे पती, अभिनेते अविनाश नारकर, हे मराठी मनोरंजनसृष्टीतील चर्चेत असणारं कपल आहे. दोघंही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात.

आणखी वाचा – केस जिंकणं अर्जुनला पडतंय महागात, जीवे मारण्याची धमकी मिळाली अन्…; सायली पतीला वाचवणार का?

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

अशातच ऐश्वर्या यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील टॉपलेस फोटोशूटने साऱ्यांच लक्ष वेधलं आहे. या फोटोवर एका नेटकऱ्याने ऐश्वर्या यांना ट्रोल करत, ‘ताई, तुम्हाला शोभत नाही, आपली संस्कृती नका विसरु’, असं म्हटलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “आपण एक नावाजलेली अभिनेत्री आहात; या वयात असा लूक का?”. तर एकाने, “साठी बुद्धी नाठी होते ते ऐकलं होत आज पाहिलं पण”, असं म्हणत टोमणा दिला आहे. तर एका नेटकऱ्याने, “कशासाठी हे?चांगले नावाजलेले कलाकार आहात तुम्ही. आता या वयात हे असं दाखवून काय प्रसिद्धी मिळणार आहे का?”, असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – फराह खानला कुक दिलीप कुठे भेटला?, १३ वर्षांपूर्वीच्या भेटीमागचा किस्सा…; अजय देवगणच्या आईशी आहे खास कनेक्शन

याउलट, काही चाहत्यांनी मात्र ट्रोल करणाऱ्यांवरच टीका करत ऐश्वर्या यांचा बचाव केला. “पन्नासाव्या वर्षी वाढलेलं पोट आणि टक्कल घेऊन फिरणारे लोक जेव्हा इतरांच्या लूकवर टीका करतात तेव्हा त्यांनी स्वतःचं प्रतिबिंब पाहायला हवं”, असं म्हणत ऐश्वर्या यांची बाजू घेतली. काहींनी तर सरळ लिहिलं की, ‘हिंदी अभिनेत्रींवर तुम्ही फिदा होता आणि मराठी अभिनेत्रीने फॅशन केली की ट्रोल करता- दुहेरी निकष का?”.

Tags: aishwarya narkaraishwarya narkar trollmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Dashavatar Artist Passed Away

दशावतारात स्त्रीपात्र गाजवणाऱ्या कलावंताचे निधन, विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.