शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दशावतारात स्त्रीपात्र गाजवणाऱ्या कलावंताचे निधन, विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 2, 2025 | 4:49 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dashavatar Artist Passed Away

दशावतारात स्त्रीपात्र गाजवणाऱ्या कलावंताचे निधन, विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

Dashavatar Artist Passed Away : कोकण आणि दशावतार हे वेगळंच समिकरण आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही लोककला कोकणात अजूनही जपली गेली आहे ती या कलाकारांमुळेच. प्रत्येक दशावतारी कलाकार आपल्या पात्राची तयारी स्वतःच करतो. प्रत्येकाचे संवाद स्वतःचेच असतात. रंगभूषाही स्वतःच केली जाते. रंगभुषेसाठी खडूचे रंग वापरले जातात. समोर जी महिला आपली कला उत्तम प्रकारे सादर करीत आहे खरंतर ती महिला नसून तो एक पुरुष आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दशावतारी नाटकांत काम करणारे सर्व कलाकार हे पुरुषच असतात. स्त्री भुमिका करणाऱ्या पुरुषांचा मेकअप आणि पेहराव तर खऱ्या स्त्रियांना सुद्धा लाजवेल असा असतो.

केवळ कोकणवासीयांनाच नव्हे तर इतर प्रांतातील लोकांनाही या दशावताराबद्दल अप्रूप असते. पण याच कोकणातल्या एका दशावतारी संघाकडून एक दु:खद बातमी समोर येत आहे. दशावतारी नाटकातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथे राहणाऱ्या प्रशांत रामचंद्र मेस्त्री यांचे निधन झाले आहे. प्रशांत यांनी दशावतारात अनेक स्त्री भूमिका साकारुन अजारामर केल्या. त्यांच्या अचानक निधनाने कोकणात शोककळा पसरली आहे. तसेच कलावंतांमध्येही दु:खद वातावरण निर्माण झाले आहे.

आणखी वाचा – फराह खानला कुक दिलीप कुठे भेटला?, १३ वर्षांपूर्वीच्या भेटीमागचा किस्सा…; अजय देवगणच्या आईशी आहे खास कनेक्शन

शुक्रवारी सकाळी प्रशांत मेस्त्री आपल्या लहानग्या मुलाला अंगणवाडीत सोडून आले. त्यानंतर मित्रमंडळींसोबत गप्पा मारुन घरी आल्यावर त्यांनी आपली टू व्हिलर गाडी धुण्याची इलेक्ट्रिक मशीनची वायर तपासत होते. त्यावेळी त्यांना विजेचा जोरात धक्का बसला अन् ते जागीच कोसळले. त्यांचे मित्र आणि शेजाऱ्यांनी त्यांना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने त्यांना मृत घोषित केले. प्रशांत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.

आणखी वाचा – “या वयात शोभतं का?”, बॅकलेस फोटोशूटवरुन ऐश्वर्या नारकर ट्रोल, तर चाहत्यांनी घेतली बाजू, म्हणाले, “हिंदी अभिनेत्रींवर फिदा होता…”

प्रशांत मेस्त्री यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी दशावतारात स्त्री पात्र गाजवली. दशावतारी खेळातले ते हुकूमी एक्का असल्याचे म्हटले जायचे. सौभद्र, महारथी कर्ण, दौपदी वस्त्रहरण यांसारख्या दशावतारी नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या.

Tags: DashavatarDashavatar artist deathkokan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Excess Salt and Heart Risk

तुम्हीसुद्धा जेवणात मिठाचा अधिक वापर करताय?, वेळीच सावध व्हा, गंभीर आजाराला निमंत्रण आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.