वयाची पन्नाशी ओलांडलेल्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जातं, ते नाव म्हणजे मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. अनेक मराठी मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणात ऐश्वर्या यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. इतकंच नव्हे तर ऐश्वर्या यांनी त्यांच्या सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. ऐश्वर्या यांच्या सौंदर्याचे लाखो दिवाने चाहते आहेत. तरुणाईला मागे पाडतील अशी ऊर्जा ऐश्वर्या यांच्यात आहे. (Aishwarya Narkar Reel Video)
ऐश्वर्या यांचा सोशल मीडियावरील वावरही बऱ्यापैकी मोठा आहे. नेहमीच त्या सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. ऐश्वर्या यांचे अनेक रील व्हिडीओही प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. बरेचदा त्या ट्रेंडिग रीलवर थिरकताना पाहायला मिळाल्या आहेत. बरेचदा ऐश्वर्या त्यांचे पती अविनाश यांच्यासह रील व्हिडीओ शेअर करतात. यानंतर आता अभिनेत्रीच्या एका रील व्हिडीओने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा वळवल्या आहेत.
ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अभिनेत्री अश्विनी कासारबरोबरचा एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्या धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. माधुरी दीक्षित व मनीषा कोईराला यांच्या ‘बडी मुश्किल…’ या गाण्याची बरीच चर्चा रंगली होती. बॉलीवूडमध्ये हे गाणं अजरामर ठरलं. याशिवाय माधुरी दीक्षित व मनीषा कोइरालाचा अप्रतिम डान्स, सुंदर हावभाव पाहून सगळेच घायाळ झाले होते. या गाण्यावर आता ऐश्वर्या व अश्विनी यांचा डान्स पाहणं अतिशय रंजक ठरलं. ऐश्वर्या यांनी गाण्यातील स्टेप करत दिलेले हावभाव साऱ्यांच्या पसंतीस पडले.
ऐश्वर्या यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या या डान्स व्हिडीओचे भरभरून कौतुक केले आहे. दरम्यान अभिनेत्रीने दिलेले हावभाव पाहून पती अविनाश नारकरांनी केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अविनाश यांनी हार्ट इमोजी शेअर करत पत्नीच्या या डान्सचं कौतुक केलं आहे. “जुन्या गाण्यांवर अशा छोट्या छोट्या स्टेप्स करून रील करता. खूप छान वाटतात. दोघींचे हावभाव कमाल”, “आई लेकीचा सुंदर अभिनय” अशा अनेक कमेंट करत दोघींचं कौतुक केलं आहे.