टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर दीपिकाचा कुटुंबाबरोबरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दीपिका कक्कर व शोएब इब्राहिम २२ फेब्रुवारी २०१८ रोजी विवाहबद्ध झाले. लग्नाच्या पाच वर्षानंतर २१ जून २०२३ रोजी दोघांनी त्यांच्या गोंडस मुलाला जन्म दिला. यावेळी त्यांनी छोटा राजकुमार रुहानचे स्वागत केले. त्यानंतर हे जोडपं आपल्या लेकाबरोबरचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करतानाही दिसले. सध्या शोएब ‘झलक दिखला जा ११’ मध्ये स्पर्धक म्हणून पाहायला मिळत आहे. (Dipika Kakar Pregnency)
दीपिका अनेकदा लेकासह पतीला भेटण्यासाठी सेटवर येत असते. अशातच ‘झलक दिखला जा ११’च्या सेटवर नुकतेच हे कुटुंब एकत्र पाहायला मिळाले. त्यांचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झालेले पाहायला मिळाले. फोटो व्हायरल झाल्यानंतर दीपिका कक्करच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शोएब ‘झलक दिखला जा ११’च्या सेटबाहेर त्याच्या फॅमिलीबरोबर पोज देताना दिसला. शोएब इब्राहिम आपला मुलगा रुहानला कुशीत घेत पोज देत होता.
यावेळी दीपिका लाल रंगाच्या अनारकली सूटमध्ये खूपच आकर्षक दिसत होती. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये लक्ष वेधून घेतलेली गोष्ट म्हणजे दीपिकाने तिची ओढणी सांभाळण्याचा केलेला प्रयत्न. अभिनेत्रीने तिची ओढणी अशा प्रकारे पिन केली होती की तिचे पोट झाकले जाऊ शकते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर, अभिनेत्री तिचा मुलगा रुहानच्या जन्मानंतर सात महिन्यांनी पुन्हा गरोदर असल्याची अफवा पसरली. दरम्यान, अभिनेत्री तिचा बेबी बंप ओढणीने लपवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या अफवा आहेत.
यानंतर दीपिका पुन्हा आई होणार असल्याची चर्चा सुरु झाली. तसेच, समोर आलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीचे वजनही खूप वाढलेले दिसत होते. मात्र, या अफवांवर अद्याप दीपिका वा शोएबने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दीपिका दुसऱ्यांदा गरोदर असल्याची अफवा पसरताच चाहत्यांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.