Arijit Singh Performance News :अरिजित सिंगच्या आवाजाचे लाखो चाहते दिवाने आहेत. गायकाच्या आवाजाबरोबरचं त्याच्या साधेपणाचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. पण अलीकडे रॅपर इक्का सिंग आणि रफ्तार यांनी गायकाबाबत केलेले काही खुलासे धक्कादायक आहेत. एआर रहमान एका लाइव्ह शोसाठी तीन कोटी रुपये इतकी रक्कम घेतो, पण एकदा अरिजितने मुंबईत एका लग्नात दीड तासाच्या परफॉर्मन्ससाठी डुप्लेक्स घर घेतले, असल्याचा खुलासा त्यांनी केला. मुंबईत डुप्लेक्स अपार्टमेंटची किंमत किती असेल याचा विचार केलेला बरा. फरक एवढाच आहे की, “अरिजीत गाजावाजा करत नाही”.
रॅपर इक्का सिंगने ऑनेस्टली सेइंग पॉडकास्टवर बोलताना सांगितले, ‘अरिजित सिंग जितके पैसे कमावतो ते खूप जास्त आहेत आणि तो वेडा माणूस आहे. म्युझिक इंडस्ट्रीतील लोक स्वतःला श्रीमंत समजतात, अगदी श्रीमंत दिसतात. यामध्ये आमचाही समावेश आहे, पण अरिजीत आमच्यासारख्या १०० लोकांना स्टेजवर बोलावू शकतो”. इक्का सिंगने अरिजित सिंगच्या साध्या स्वभावाची आंतरराष्ट्रीय रॅपर एमिनेमशी तुलना केली, जो आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट रॅपर असूनही, त्याचे वैयक्तिक जीवन साधेपणाने जगतो आणि त्याची विलासी बाजू लोकांच्या नजरेपासून दूर ठेवतो.
आणखी वाचा – “तू म्हातारी झालीस हे स्वीकार”, नेटकऱ्याने डिवचताच ऐश्वर्या नारकर भडकल्या, उत्तर देत म्हणाल्या, “वेळ येते…”
अरिजितबद्दल पुढे बोलताना इक्काने एक किस्सा शेअर केला, ‘एकदा तो शो करुन तो बाहेर गेला होता, त्याची गाडी यायला वेळ लागत होता. त्यावेळी तो वाट न पाहता समोर उभ्या असलेल्या रिक्षामध्ये बसून तो घराकडे निघाला. दुसरा किस्सा असा आहे की, अरजीतला लग्नाचे कार्यक्रम करायला आवडत नाहीत, कोणीतरी आग्रह केला की त्याने कार्यक्रम करावा, त्या बदल्यात त्याला मुंबईत डुप्लेक्स घर मिळाले. मुंबईत डुप्लेक्स घराची त्याने हे घर एक ते दीड तासांच्या कामगिरीसाठी घेतले होते.
एआर रहमानशी अरजीत यांची तुलना करताना इक्का म्हणाला, “रहमान सर लाइव्ह शो करण्यासाठी तीन कोटी रुपये घेतात. फक्त बघा अरिजित सर किती घेतात. ही देखील वेळेची बाब आहे, परंतु ते याबद्दल कधीच गाजावाजा करत नाहीत, आणि हाच त्यांच्यात फरक आहे”.