बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“स्वयंपाक येत नाही म्हणून हिणवलं गेलं अन्…”, मधुराणी प्रभुलकरची मोठी खंत, म्हणाली, “सुपरवूमनच्या चौकटीत…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 11, 2025 | 5:00 pm
in Women
Reading Time: 3 mins read
google-news
Madhurani Prabhulkar not interested in cooking

“स्वयंपाक येत नाही म्हणून हिणवलं गेलं अन्...”, मधुराणी प्रभुलकरची मोठी खंत, म्हणाली, “सुपरवूमनच्या चौकटीत...”

स्त्री म्हटल्यावर ती सूपरवुमनच असली पाहिजे असे अनेक समज-गैरसमज असूनही समाजात आहेत. तिला प्रत्येक काम आलं पाहिजे हा मोठा अट्टाहास. पण काही कलांमध्ये ती प्रगत असेल आणि एखादं काम स्त्रीला आलंच नाही तर तिच्याकडे वेगळ्या नजरेने का पाहिलं जातं? हा मोठा प्रश्नच आहे. बरं याबाबत फारसं कोणीच उघडपणे बोलतंही नाही. मात्र ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने हे धाडस केलं. तिला स्वतःला स्वयंपाक करता येत नाही. त्याची आवडही नाही. वेळ पडली तर डाळ, भात, भाजी इतकं साधं ती करु शकते. पण यावरुनही मधुराणीला बरंच हिणवलं गेलं. याचविषयी तिने आता रोखठोक मत मांडलं आहे. (Madhurani Prabhulkar not interested in cooking)

आरपारला दिलेल्या मुलाखतीत तिने स्त्रिया व समाजाबाबतचे स्पष्ट मत मांडले. तसेच स्वयंपाक येत नसल्याचीही उघडपणे कबुली दिली. मधुराणी म्हणाली, “मला स्वयंपाक करता येत नाही. पण मला त्याची आवड नाही. म्हणजे ते काय तरी भिजवत ठेवा, मग ते उकळत घाला, त्याच्यात हे ते पदार्थ घाला, परत २० मिनिटं तसंच ठेवा असं कायतरी ते खूप गोंधळून टाकणारं असतं. मला भिती वाटते. मला नाही जमत ते. रोजचं भाजी, भात, वरण इतकं साधंच जमतं”.

आणखी वाचा – “खूप वर्षांनी बाबा होतोय, चिंता आहे पण…”, पहिल्यांदाच दुसऱ्या बायकोच्या प्रेग्नंसीबाबत बोलला अरबाज खान, ५७व्या वर्षी बाबा होणार

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale (@madhurani.prabhulkar)

“त्या गोष्टीवरुन खूप वर्ष माझ्या मनात अपराधीपणाची भावना होती. मला असं वाटायचं की, मी स्त्री म्हणून जगत असताना कायतरी कमी पडतंय का?. स्वयंपाकाची आवड कशी नाही? असं मला सतत वाटायचं. बरं आजूबाजूच्या परिस्थितीनेही मला तसंच बघितलं. स्वयंपाक येत नाही म्हणून मला हिणवलंच होतं. आता कुठेतरी जाऊन मी स्वतःला सांगते आणि स्वीकारते की, हो नाही येत मला स्वयंपाक तर ठीक आहे. गरज पडली तर हात पाय हलवून चार लोकांना मी जेवायला घालू शकते”.

आणखी वाचा – “माझं लग्न झालं म्हणून…”, बॉलिवूडमध्ये फारसं काम न मिळण्यावरुन पहिल्यांदाच बोलली जिनिलीया देशमुख, म्हणाली, “मानसिकता…”

“पण आवडीने तुम्ही या घरी मी हे करते ते करते इतकं मला नाही होत. तो माझा झोन नाही. स्त्रीकडे जी गोष्ट नाही त्याच गोष्टीवरुन तिला कायम जज केलं जातं. सुपरवूमनच्या चौकटीत स्त्रिया स्वतःचीच खूप घुसमट करुन घेतात. आपण सगळ्यातच खूप बेस्ट असलं पाहिजे असं कधीच होत नाही. सगळं करण्याची स्त्रियांची ताकद आहे का? तर याचं उत्तर आहे हो. पण अडचणीही तेवढ्याच आहेत. तर कुठेतरी कमी जास्त होणार. तर ठीक आहे”. मधुराणीचे हे विचार खरंच कौतुकास्पद आणि समाजाला विचार करायला लावणारे आहेत.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Zee Marathi Channel

एक नवं रुप, नव्या नात्यांसह…; 'झी मराठी' वाहिनीची अनोखी सुरुवात, नवीन अध्याय, नवीन वाटचाल सुरु करणार आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.