शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एक नवं रुप, नव्या नात्यांसह…; ‘झी मराठी’ वाहिनीची अनोखी सुरुवात, नवीन अध्याय, नवीन वाटचाल सुरु करणार आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 11, 2025 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Zee Marathi Channel

एक नवं रुप, नव्या नात्यांसह...; 'झी मराठी' वाहिनीची अनोखी सुरुवात, नवीन अध्याय, नवीन वाटचाल सुरु करणार आणि...

Zee Marathi Channel : गेली २६ वर्ष महाराष्ट्राच्या घराघरांत प्रेम मिळवणारी, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ‘मी मराठी झी मराठी’ असं अभिमानाने म्हणत महाराष्ट्र आणि देशविदेशात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे आपला एक वेगळा ठसा उमटवला. आता हीच आपली झी मराठी नवीन ओळख आणि एक नवा अध्याय सुरु करत आहे. ‘सदैव तुमची झी मराठी’ , या ओळींमागे आहे एक साधा पण खोलवर जाणा-या भावनेचा विचार. “सदैव तुमची” ही भावना आहे आपलेपणाची, एकत्रतेची आणि छोट्या-छोट्या क्षणांमधून निर्माण होणाऱ्या मोठ्या भावनिक बंधांची. ‘झी मराठी’ आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती, भावना, आणि दैनंदिन जीवनातल्या सत्य घटनांना सिनेमॅटिक रुप देते.

या मोहिमेबद्दल ‘झी एंटरटेनमेंट’ एंटरप्रायझेस लिमिटेडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक महादेव, बोलताना म्हणाले ‘आपका अपना झी’. हे एक ताकदवान कॅम्पेन आहे ज्यात बहुभाषिक ब्रँड फिल्म सिरीज बनवल्या गेल्या आहेत. आपल्या देशातील विविध भागांचे दर्शन घडवते. ही मोहीम दाखवते की भारतातील लोक एकमेकांसाठी कसे उभे राहतात. सातही फिल्म्स त्यांच्या-त्यांच्या भागाच्या संस्कृतीशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्या भागांची चाल, रुढी, निसर्गदृश्यं आणि लोकांची खरी ओळख उलगडतात. केरळमध्ये पावसालाही एक पात्र म्हणून दाखवलं आहे, तर आंध्र प्रदेश मधल्या एका गावाचा सैन्य सेवेचा वारसा उलगडला आहे. प्रत्येक गोष्ट भारताच्या सांस्कृतिक विविधता आणि भावनिक सत्य दाखवते. ही मोहीम झी आपल्या प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्यात एक विश्वासू सोबती म्हणून कसा आहे, हे पुन्हा सांगते. ‘साथ हैं तो बात हैं’ ही भावना देशातील लाखो घरांच्या मनाशी जोडलेली आहे. जिथे झी फक्त पाहिलं जात नाही, तर दररोज त्याच स्वागत केलं जातं”.

आणखी वाचा – “दुसऱ्यांदा प्रेम करणं चुकीचं नाही”, ५७व्या वर्षी बाबा होणार असल्याचं जाहिर करताच अरबाज खानचं वक्तव्य, म्हणाला, “चिंतेत राहण्यापेक्षा…”

View this post on Instagram

A post shared by Zee5Marathi (@zee5_marathi)

या संदर्भात झी मराठीच्या चीफ चॅनेल ऑफिसर व्ही. आर. हेमा म्हणाल्या, “सदैव तुमची झी मराठी हे वाक्यच आपल्या नात्यांमधील भावनिक गुंतवणूक दाखवते. इथं एकमेकांच्या सुखदुःखात खांदा देऊन उभं राहणं ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. झी मराठी ही केवळ एक वाहिनी नाही, तर घराघरातली आपुलकीची एक भावना आहे. आता प्रेक्षकांबरोबरचे नातं आणखी दृढ करण्यासाठी ‘झी मराठी’ एका नवीन रूपात नवीन ढंगात प्रेक्षकांसमोर आली आहे” .

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला झाली कावीळ, पाणी उकळून पिण्याचा दिला सल्ला, कावीळवरील रामबाण उपाय आहेत तरी काय…

त्या म्हणाल्या, “या प्रवासात नव्याने सुरु झालेली ‘देवमाणूस’ आणि लवकरच सुरु होणारी ‘कमळी’ या मालिका प्रेक्षकांना नक्कीच भावतील. पुन्हा नव्याने सुरु होणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा कथाबाह्य कार्यक्रम सुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही. हे आणि असे अनेक नवनवीन सरप्राइझेस येत्या वर्षात झी मराठी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. झी मराठी ही लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनली आहे. इथे झी मराठी पाहिली जातेच, पण ती अनुभवलीही जाते. या नव्या प्रवासात आपली साथ हेच आमचं बळ आहे”. या माध्यमातून झी मराठीने आपल्या प्रेक्षकांबरोबरचं नातं आणखी घट्ट केलं आहे आणि एक असा सांस्कृतिक क्षण निर्माण केला आहे, जो प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करुन जाईल.

Tags: entertainmentmarathi serialzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Avika Gor Engaged

'बालिका वधू' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा थाटामाटात साखरपुडा, होणाऱ्या नवऱ्यासह शेअर केले रोमँटिक फोटो, शुभेच्छांचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.