बुधवार, ऑगस्ट 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कुणी तरी येणार येणार गं…; लोकप्रिय मराठी अभिनेता लग्नाच्या आठ वर्षांनी होणार बाबा, पत्नीचं थाटामाटात केलं डोहाळ जेवण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 26, 2026 | 10:29 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rohan Gujar Post

कुणी तरी येणार येणार गं…; लोकप्रिय मराठी अभिनेता लग्नाच्या आठ वर्षांनी होणार बाबा, पत्नीचं थाटामाटात केलं डोहाळ जेवण

Rohan Gujar Post : मराठी कलाविश्वात बरीच कलाकार मंडळी आनंदाची बातमी देताना दिसत आहेत. काहींनी लग्नगाठ बांधत, काहींनी साखरपुडा समारंभ उरकत तर काहींनी आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने बाबा होणार असल्याची गुडन्यूज सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. हा अभिनेता म्हणजे ‘होणार सून मी या घरची’ फेम रोहन गुजर. रोहनने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं. ‘बन पाव’, ‘लव्ह लग्न लोचा’, ‘नवी जन्मेन मी…’ या मालिकांमध्ये त्याने काम केलं. मात्र ‘होणार सून…’ मालिकेतील त्याची पिंट्या ही भूमिका विशेष गाजली. आणि या मालिकेतील त्याच्या भूमिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

रोहन त्याच्या खऱ्या आयुष्यामुळेही बरेचदा चर्चेत असलेला पाहायला मिळाला. त्याने नोव्हेंबर २०१७ मध्ये स्नेहल देशमुखबरोबर लग्नगाठ बांधली. हे दोघंही अनेक वर्षे एकमेकांना ओळखत होते. रोहन आणि स्नेहल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. अशातच सोशल मीडियावर या जोडप्याने त्यांच्या आयुष्यातील एक आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. रोहन आणि स्नेहल लवकरच आई-बाबा होणार आहेत. डोहाळेजेवणाचा सुंदर व्हिडीओ शेअर करत या जोडप्याने ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे.

आणखी वाचा – “मालिकेत माझेही पैसे बुडवले…”, थकबाकी प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “मी पोस्ट केली…”

View this post on Instagram

A post shared by Rohan J M Gujar / रोहन गुजर (@rohanatinsta)

लग्नाच्या आठ वर्षांनी रोहन व स्नेहल आई-बाबा होणार आहेत. “New Chapter प्रेमाच्या माणसांसोबत रंगलेला हा प्रेमळ सोहळा!” असं कॅप्शन रोहनने या व्हिडीओला दिलं आहे. जवळचे कुटुंबीय अन् नातेवाईंकाच्या उपस्थितीत स्नेहलच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात रोहन आणि स्नेहल या दोघांनीही Twinning लूक केल्याचं पाहायला मिळालं. रोहनने शेअर केलेल्या व्हिडीओवर मराठी कलाकारांनी कमेंट्स करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

Tags: marathi actorrohan gujar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
New Marathi Movie Dashami
Entertainment

अन्यायावर विजयाची गर्जना, ‘दशमी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याची ही एंट्री

ऑगस्ट 10, 2026 | 3:14 pm
Amruta Khanvilkar Legal Action on Divorce Rumours
Entertainment

“खोटी माहिती प्रसारित केल्यास…”, अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अभिनेत्री संतापली; पोस्ट शेअर करत कडक कारवाईचा इशारा

ऑगस्ट 10, 2026 | 12:54 pm
Next Post
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Net Worth

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्यात श्रीमंत कोण? दोघेही पैसे कोठून कमवतात? जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.