सध्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा चालू आहे. यंदाचा हा कुंभमेळा आणखी खास आहे कारण तो तब्बल १४४ वर्षांनी आला आहे. त्यामुळे केवळ देशातच नव्हे तर देशाविदेशातील सर्वसामान्यांपासून ते मोठमोठ्या नामांकित व्यक्तीसुद्धा भारतात दाखल झाल्या आहेत. यंदाच्या महा कुंभमेळ्यामध्ये वेगवेगळे अघोरी आणि नागा साधू बाबा यांचे महिन्याभरापूर्वीच प्रयागराज येथे आगमन झाले होते. या बाबांचे फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. याशिवाय अनेक सेलिब्रिटी मंडळींनी सुद्धा या ठिकाणी जाऊन पवित्र स्नान केले. नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र स्नान केलं. (Swapnil Joshi holy bath in Mahakumbh)
अनेक हिंदी कलाकारांनी या कुंभमेळ्यात सहभागी होत पवित्र स्नान केलं आहे. पूनम पांडे, किटू गिडवानी, फिल्म निर्माता कबीर खान, कॉमेडियन-अभिनेता सुनील ग्रोवर, गायक-अभिनेता गुरु रंधावा, अविनाश तिवारी, अनुपम खेर, भाग्यश्री, रेमो डिसूजा, सिद्धार्थ निगम, प्रियंका चोपड़ा की मां मधु चोपड़ा, तनीषा मुखर्जी, ममता कुलकर्णी यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी कुंभमेळ्यात सहभाग घेतला. सौरभ चौगुले, प्रवीण व स्नेहल तरडे यांनी यांनी कुंभमेळ्यात सहभाग घेतला. पवित्र स्नानाचे काही खास क्षण त्यांनी शेअर केले आहेत.
आणखी वाचा – पहिल्या ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’ने राहुल देशपांडेंचा गौरव, म्हणाले, “हा सन्मान स्वीकारताना…”
अशातच आता मराठी अभिनेता स्वप्निल जोशीनेही कुंभमेळ्यात स्नान केलं आहे आणि त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. याबद्दल स्वप्निल असं म्हणाला आहे की, “महाकुंभ २०२५… आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव! प्रयागराजमध्ये महाकुंभ २०२५ ला उपस्थित राहण्याचा आणि महासंगमात पवित्र स्नान करण्याचा योग आला. हा दिव्य प्रवास अनुभवण्याचे भाग्य लाभले, यासाठी माझ्या भावाला सौरभ गाडगील आणि त्यांच्या परिवाराला धन्यवाद”.
आणखी वाचा – Video : …अन् ८३ वर्षीय सलमान खानच्या आईचा गेला तोल, केअर टेकरने लगेचच दिली साथ, व्हिडीओ व्हायरल
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “कुटुंब आणि प्रियजनांसाठी प्रार्थना केली, सकारात्मक ऊर्जा आत्मसात केली, डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले! या अद्भुत महाकुंभाचे साक्षीदार होण्याचा सन्मान मिळणं, हा दैवी आशीर्वाद वाटतो. हा सनातन धर्म, मानवता, प्रेम आणि भक्तीचा सर्वात मोठा उत्सव आहे. या क्षणाची अनुभूती शब्दांत मांडता येणार नाही. खरंच दिव्य अनुभव”. दरम्यान, त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.