बॉलिवूड अभिनेता सलमान खानला त्याची आई सलमा खूप जास्त आवडते. जेव्हाही कौटुंबिक कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ समोर येतात, तेव्हा सलमान कायम त्याच्या आईबरोबर दिसतो.दोघांमधील खास नात्याबद्दल सोशल मीडियावर कायमच चर्चा होताना दिसते. दोघांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच सलमानची आई सलमा खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांचा तोल हा जाताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. सलमानचे अनेक चाहते, त्याच्या आईविषयी आता चिंतेत असल्याचे दिसत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. (salman khan mother video)
व्हिडीओमध्ये सलमा खान या कुठेतरी बाहेर जात असून त्या त्यांच्या गाडीच्या दिशेन जाताना दिसत आहे. यानंतर त्यांचा अचानक तोल जातो आणि त्यांना एक मागे असलेली महिला पकडते. गाडीपर्यंत जाताना त्यांना अनेक लोकांची गरज भासत असल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे. सलमा खानच्या या व्हिडिओवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. शिवाय अनेकांनी अभिनेत्याच्या आईबद्दल चिंताही व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – नवा शो मिळताच दीपिका कक्करकडून स्टाफची हकालपट्टी, अभिनेत्रीवर गंभीर आरोप, म्हणाली, “संधी मागितली पण…”
या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने असं म्हटलं आहे की, “तुम्ही तुमच्याबरोबर व्हीलचेअर का आणली नाही?” तर दुसऱ्या एकानं लिहिलं आहे की, “आम्हा सर्वांच्या प्रार्थना तुमच्याबरोबर आहेत” यानंतर आणखी एकानं लिहिलं आहे की, “या पूर्ण बॉलिवूडची आई आहेत”. याशिवाय अनेकांनी या व्हिडिओवर हार्ट इमोजी शेअर करत “काळजी घ्या सलमा जी” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – पहिल्या ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’ने राहुल देशपांडेंचा गौरव, म्हणाले, “हा सन्मान स्वीकारताना…”
दरम्यान, सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’ हा आहे. या चित्रपटामध्ये तो अभिनेत्री रश्मिका मंदान्नाबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या निमित्तानं प्रदर्शित होणार आहे. शिवाय सलमान ‘वांटेड 2’, ‘द बुल’, ‘इंशाअल्लाह’, ‘दबंग 4’, ‘किक 2’, ‘नो एंट्री’ आणि ‘पवन पुत्र भाईजान’ या चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.