गेल्या तीन दशकाहून अधिक काळ आपल्या आवाजाने लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारे गायक म्हणजे लकी अली. लकी अली यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीला आजवर एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत. याच कारणामुळे ९० च्या दशकात या गायकाचे नाव सर्वांच्याच मुखी होते. त्यांची आतापर्यंतची संपूर्ण कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. पण त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच संघर्ष आणि अडचणींनी भरलेले आहे. लकी अली यांनी आतापर्यंत तीन लग्ने केली आहेत. पण यातील एकही लग्न टिकले नाही. यामुळे आज ते एकाकी आयुष्य जगत आहे. तीन लग्नांनंतर त्यांनी आता चौथ्या लग्नाची इच्छा व्यक्त केली आहे. (Lucky Ali fourth marriage)
लकी अली नुकतेच आंतरराष्ट्रीय स्टोरीटेलर्स फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी चौथ्या लग्नाची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, “त्याच्या जीवनाचा उद्देश काय आहे?” यावर गायकाने उत्तर दिले की, “उद्देश फक्त या जगात येणे आणि जाणे आहे. आपल्याकडे दूसरा कोणताही मार्ग नाही.” यानंतर जेव्हा लकी यांना त्यांच्या स्वप्नांबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले की, “माझे स्वप्न पुन्हा लग्न करण्याचे आहे”. आता लकी अली हे फक्त मस्करीत म्हणाले की, ते खरोखर चौथ्यांदा लग्न करण्याचा विचार करत आहेत? याचा नेमका खुलासा झालेला नाही.
आणखी वाचा – पहिल्या ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’ने राहुल देशपांडेंचा गौरव, म्हणाले, “हा सन्मान स्वीकारताना…”
लकी अली यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मेघन जेन आहे. मेघन जेन मॅकक्लेरी मूळची न्यूझीलंड येथील होती. दोघे वायएमसीएमध्ये शिकत असताना दोघांची भेट झाली. एकत्र काम करत असताना लकी अली आणि मेघना जवळ आले. एका मुलाखतीत लकी अली यांनी सांगितले की, मेघन भारतात परतल्यानंतर पहिल्या दिवशी भेटले. दुसऱ्या दिवशी प्रपोज केले आणि तिसऱ्या दिवशी दोघांनी लग्न केले. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. काही काळानंतर दोघे वेगळे झाले”.
आणखी वाचा – Video : …अन् ८३ वर्षीय सलमान खानच्या आईचा गेला तोल, केअर टेकरने लगेचच दिली साथ, व्हिडीओ व्हायरल
त्यानंतर लकी अली त्यांच्या आयुष्यात अनहिता नावाची दुसरी महिला आली. अनाहिता ही पारशी महिला होती. दोघांनीही आपलं नातं गुपचूप सुरू केलं. त्यानंतर दोघांनी लग्न केले. अनाहिता आणि लकी यांना दोन मुले आहेत. मात्र, लकी अली यांचे हे नातेही टिकले नाही. यानंतर लकी अली यांच्या आयुष्यात माजी मिस इंडिया केट एलिझाबेथ हलम आली. २००९ मध्ये दोघांची भेट झाली आणि काही काळानंतर दोघांनी बंगळुरू कोर्टात लग्न केले. मात्र, या दोघांमधील नातंही टिकू शकले नाही.