मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बाईला पुरुष लागतोच”, आईच्या दुसऱ्या लग्नाबाबत सिद्धार्थ चांदेकर स्पष्टच बोलला, म्हणालेला, “माझ्या आईच आयुष्य…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 13, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Siddharth Chandekar On Mother

"बाईला पुरुष लागतोच", आईच्या दुसऱ्या लग्नाबाबत सिद्धार्थ चांदेकर स्पष्टच बोलला, म्हणालेला, "माझ्या आईच आयुष्य…"

Siddharth Chandekar On Mother : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थने आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट यांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं. सिद्धार्थ त्याच्या व्यासायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असलेला पाहायला मिळाला आहे. अशातच सिद्धार्थ त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आलेला दिसला. सिद्धार्थ चांदेकरच्या आईने २०२४ मध्ये वयाच्या ५४व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. सिद्धार्थने स्वतः त्याच्या आईचं लग्न लावून दिलं, चाहत्यांनी अभिनेत्याच्या या निर्णयाचं कौतुकसुद्धा केलं. आता दोन वर्षांनी सिद्धार्थ त्याच्या आईच्या लग्नाबाबत बोलला आहे.

‘दॅट ऑड इंजिनिअर’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सिद्धार्थ चांदेकरला, “जेव्हा आईचं तू लग्न करायचं ठरवलं, तेव्हा विचार नाही आला का? अरे लोकं काय म्हणतील?, असा विचार तुझ्या मनात आला नाही का?”. यावर सिद्धार्थ म्हणाला की, “कुठल्याच माणसाने ज्याचे याबाबतीत काही मत असेल त्याने माझ्या आईच आयुष्य जगलं नाही आहे. त्यामुळे मी आधी आईचा विचार करेल. तिने आम्हाला लाखवेळा विचारलं तुम्हाला हे चालणार आहे का?, आम्ही तिला तुझा आनंद महत्त्वाचा आहे. या संपूर्ण जगात या निर्णयाला घेऊन कोणीही महत्त्वाचं नाही आहे जेवढं माझ्या आईचं मत महत्त्वाचं आहे. आईच्या लग्नाला आता वर्ष होऊन गेलेलं आहे. मी त्या बाईला जेवढं खुश पाहिलंय ना या वर्षभरात तेवढं मी १२-१५ वर्षे घटस्फोटानंतर नव्हतं पाहिलं. आपल्या आईला लागतं ना, गप्पा मारायला, संवाद साधायला किंवा एक असा पुरुष लागतोच ना. बाईला पुरुष लागतोच, पुरुषाला बाई ही लागतेच आणि त्या वयामध्ये जेव्हा मनातलं सांगायला, मुलगा फार नाही पुरत हे लक्षात घ्या”.

आणखी वाचा – “राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर…”, तेजस्विनी पंडितच भाष्य, म्हणाली, “स्वतःच्या कुटुंबापेक्षाही…”

पुढे तो म्हणाला, “परत तुमचा मेल इगो थोडासा याबाबतीत बाजूला ठेवा. मी तो पुरुष नाही, जो आईचं सगळं बघू शकेल. मी करेनच म्हणजे लाख मेहनत करेन, मी तिच्यासाठी वाटेल ते करेन. पण तिच्या मेंटल पीससाठी मी काय देऊ शकतो आणि जे या वर्षभरात मी त्या बाईला जेवढं खुश पाहिलेलं आहे, रिलॅक्स पाहिलेलं आहे, मग मला असं वाटतं की, कोणी काही का बोलेना मला काय करायचंय. माझी आई खुश आहे”.

आणखी वाचा – ‘मुंबई लोकल’मध्ये एकमेकांना पाहणाऱ्या दोघांची रंगतदार गोष्ट, प्रेमाची कबुली देणार का?, टिझर पाहून उत्सुकता वाढली

दुसऱ्या लग्नापूर्वी बरीच वर्ष सीमा चांदेकर या एकट्याच संपूर्ण घर सांभाळत होत्या. पण सीमा यांनी नव्याने संसार करायचा ठरवलं आणि लेक सिद्धार्थ व सून मिताली मयेकरनेही त्यांच्या या निर्णयाला हसत होकार दिला. आता सीमा चांदेकर त्यांच्या जोडीदाराबरोबर आनंदाने संसार करत आहेत.

Tags: marathi actormarathi entertainment newssiddharth chandekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
 shefali jariwala death

शेफाली जरीवालाचा मृत्यू IV ड्रिपमुळे झाला का? न्यूट्रिशनिस्टकडून अँटी-एजिंग सप्लिमेंट्सबद्दल खुलासा, म्हणाल्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.