बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘मुंबई लोकल’मध्ये एकमेकांना पाहणाऱ्या दोघांची रंगतदार गोष्ट, प्रेमाची कबुली देणार का?, टिझर पाहून उत्सुकता वाढली

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 12, 2025 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mumbai Local Marathi Movie

'मुंबई लोकल'मध्ये एकमेकांना पाहणाऱ्या दोघांची रंगतदार गोष्ट, प्रेमाची कबुली देणार का?, टिझर पाहून उत्सुकता वाढली

Mumbai Local Marathi Movie : आयुष्यात प्रत्येक गोष्ट गमावत असलेली ती आयुष्यातली प्रत्येक लढाई हरत असलेला तो यांच्या प्रेमकहाणीला आता हिरवा सिग्नल मिळाला आहे. ‘मुंबई लोकल’ या चित्रपटातून ही प्रेमकहाणी उलगडणार असून, येत्या १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे. चित्रपटाचे पोस्टर जेव्हा समोर आलं तेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. शिवाय ही एक आगळी वेगळी प्रेमकहाणी मोठ्या पडद्यावर पाहण्यास समस्त प्रेक्षकवर्ग उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘मुंबई लोकल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं आहे. ‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’, ‘आनंदी एंटरटेनमेंट’ आणि ‘स्प्लेंडिड प्रॉडक्शन्स’ने या चित्रपटाची निर्मिती केली असून निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी हे ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाचे निर्माते आहेत तर त्र्यंबक डागा हे सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून, मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आणखी वाचा – बॉयफ्रेंडबरोबर ब्रेकअपसाठी भलत्याच पुरुषाशी शरीरसंबंध अन्…; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “अनेकांना डेट…”

चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे. तर विनोद शिंदे हे असोसिएट डिरेक्टर आणि कलादिग्दर्शक डॉ.सुमित पाटील आहेत. चित्रपटातील गाणी गीतकार अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांची असून देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी व हर्षवर्धन वावरे यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केले आहे तर पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांचे आहे. असोसिएट डिरेक्टर म्हणून निकुंज मालपाणी यांनी काम पाहिले आहे तर नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे यांचे आहे.

आणखी वाचा – वयवर्ष जवळपास ८०, नीट चालताही येत नव्हतं तरीही…; संकर्षण कऱ्हाडेच्या चाहत्यांच्या ‘त्या’ कृतीचं कौतुक, अभिनेताही भारावला

‘मुंबई लोकल’मध्ये एकमेकांना पाहणाऱ्या दोघांची गोष्ट या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. त्या दोघांचा स्वतःचा असा स्ट्रगल आहे. मात्र, लोकलमध्ये एकमेकांना पाहताना ते एकत्र कसे येतात, त्यांच्यात प्रेम कसं फुलतं याची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रेमाच्या नात्याप्रमाणेच चित्रपटाचा टीजरही हळुवारपणे उलगडत जातो. त्यामुळेच या चित्रपटाविषयीची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. त्यामुळे मुंबई लोकलमध्ये फुलणारी ही प्रेमाची गोष्ट मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी आता १ ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Tags: entertainmentmarathi movieMumbai Local
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Saath Nibhana Saathiya Gopi Bahu

एका निर्णयाने गोपी बहूचं उद्ध्वस्त झालं करिअर, खऱ्या आयुष्यावरही मोठा परिणाम, आता जगतेय असं आयुष्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.