शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर…”, तेजस्विनी पंडितच भाष्य, म्हणाली, “स्वतःच्या कुटुंबापेक्षाही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 12, 2025 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tejaswini Pandit Raj Thackeray

"राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर…", तेजस्विनी पंडितच भाष्य, म्हणाली, "स्वतःच्या कुटुंबापेक्षाही…"

Tejaswini Pandit Raj Thackeray : मराठी-हिंदी भाषेमुळे राज ठाकरे सध्या चर्चेत असलेले पाहायला मिळत आहेत. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्यावतीने मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. तेव्हापासून ठाकरे बंधू चर्चेत असलेले पाहायला मिळाले. या आनंदात अनेक कलाकार मंडळीही सहभागी असलेले पाहायला मिळाले. अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शविला. दरम्यान अभिनेत्री तेजस्विनी पंडित नेहमीच राज ठाकरे यांच्या पक्षाच्या बाजूने, राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ भाष्य करताना दिसतात. जल्लोष मेळाव्यातही ती सहभागी झाली होती. इतकंच नाहीतर राज ठाकरे यांच्या बद्दलच्या भावना ती नेहमीच सोशल मीडियावरुन शेअर करताना दिसते.

तेजस्विनीने मराठी भाषा मुद्द्यावरुन राज यांना पाठिंबा दिला. यानंतर आता अभिनेत्रीने ‘अजब गजब’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांच्याबाबत भाष्य केलं. अभिनेत्रीचं हे भाष्य सध्या चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे. या मुलाखतीत तेजस्विनीला ‘राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर…’, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर उत्तर देत तेजस्विनी म्हणाली, “ते मुख्यमंत्री झाले तर आपला महाराष्ट्र खूप भारी असेल, त्यांचं व्हिजन खूप छान आहे. मी त्यांच्याशी वैयक्तिकपणे अनेकदा बोलली आहे आणि त्यांच्या बोलण्यातूनच जाणवतं की, तो माणूस महाराष्ट्राला अगदी वरचं स्थान देतो, स्वतःच्या कुटुंबापेक्षाही जास्त. मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे”.

आणखी वाचा – चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, जोरात मारलं आणि…; बॉलिवूड अभिनेत्रीकडून भयानक घटनेचा खुलासा, म्हणाली, “माझा पाठलाग करत…”

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini 🕊️🧿 (@tejaswini_pandit)

पुढे ती म्हणाली, “असे खूप कमी राजकारणी आहेत. ज्यांचं बोलणं मला खूप आवडतं. नितीन गडकरी, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे ही किती छान भाषणे करायची. शरद पवार सुद्धा. मला कधी कधी वाटतं, त्यांच्या मेंदूचं संशोधन केलं पाहिजे. इतके बुद्धीवान राजकारणी आहेत. बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरेंमध्ये जे आहे ते त्यांच्याकडूनच येतं. राज साहेब बोलतात तेव्हा असं वाटतं की, ते बाळासाहेबांच्या मुखातूनच आलं आहे की काय असं वाटतं”.

आणखी वाचा – बॉयफ्रेंडबरोबर ब्रेकअपसाठी भलत्याच पुरुषाशी शरीरसंबंध अन्…; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “अनेकांना डेट…”

शेवटी तेजस्विनी म्हणाली, “पुर्वीची राजकारणी माणसं खूप वेगळी होती आणि तेव्हाचं राजकारणसुद्धा खूप वेगळं होतं. पुर्वीच्या राजकारणात नैतिकता होती, पॉवर होती. जे आता दिसत नाही. आता चित्र थोडंसं बिघडल्यासारखं वाटतं”.

Tags: marathi entertainment newsraj thackeraytejaswini pandit
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Mumbai Local Marathi Movie

'मुंबई लोकल'मध्ये एकमेकांना पाहणाऱ्या दोघांची रंगतदार गोष्ट, प्रेमाची कबुली देणार का?, टिझर पाहून उत्सुकता वाढली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.