शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शुभंकर तावडेचं ठरलं! गर्लफ्रेंडबरोबर शेअर केलेला फोटो चर्चेत, वडील म्हणाले, “देवाने बनवलेली जोडी…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 4, 2024 | 6:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Shubhankar Tawde confessed his love by sharing a photo with social media influencer Samiksha Takke.

शुभंकर तावडेचं ठरलं! गर्लफ्रेंडबरोबर शेअर केलेला फोटो चर्चेत, वडील म्हणाले, "देवाने बनवलेली जोडी..."

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते सुनील तावडे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सुनील तावडे हे गेली अनेक वर्षे मराठी मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या विनोदी व नकारात्मक भूमिकांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. त्यांच्याच पाउलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा शुभंकर तावडेदेखील या क्षेत्रात आला आहे. शुभंकरने आजवर अनेक मालिका, चित्रपट व सीरिजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा शुभंकर हा सोशल मीडियाद्वारेही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर कारेत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.

अशातच शुभंकरने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमुळे तो चांगलाहक चर्चेत आला आहे. शुभंकरने नुकतीच त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. शुभंकरने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर समीक्षा टक्केबरोबर फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. शुभंकरने समीक्षाबरोबरचा एक खास फोटो शेअर करत त्याखाली “तुम हो… जेव्हा तुमचा आनंद सांत्वनाची जागा घेतो” असं लिहिलं आहे. शुभंकरने शेअर केलेला हा फोटो होळीमधील असल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shubhankar Tawde (@shubhankar_tawde)

आणखी वाचा – अधिपतीच्या घरामधून पैसे चोरीला, भूवनेश्वरीनेच केला होता प्लॅन, अक्षरा चोराला पकडणार का?

शुभंकरने समीक्षाबरोबरचा फोटो शेअर करतातच त्यावर मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी शुभेच्छांच्या कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर, अमृता खानविलकर, मिताली मयेकर, प्रियदर्शनी इंदलकर, अमृता देशमुख, ऋता दुर्गुळे यांसारख्या अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. सुनील तावडे यांनी स्वत: सुद्धा या फोटोवर कमेंट करत “रब ने बना दी जोडी, तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा…लव्ह यू… देव तुम्हा दोघांच्या कायम पाठिशी असेल” असं म्हटलं आहे. 

आणखी वाचा – ‘आठवी-अ’ वेबसीरिजचा शेवटचा भाग प्रदर्शित, भरघोस प्रतिसादानंतर ‘दहावी अ’ची घोषणा, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, शुभंकरची गर्लफ्रेंड समीक्षा ही समीक्षा सोशल मीडियावर कॉमेडी, लाईफस्टाइल, फॅशन व स्पोर्ट्स या विषयावर वेगवेगळे कंटेंट शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या रील्सला चाहत्यांकडून अनेक लाईक्स व कमेंट्स मिळतात. तर  शुभंकर हा अभिनेता असून आजवर त्याने अनेक चित्रपट, मालिकाव सीरिजमध्ये काम केले आहे.  त्याची काळे धंदे ही वेब सिरीज खूप गाजली. नुकतीच त्याने रितेश देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटातही काम केले होते.

 
Tags: marathi entertainment newsSamiksha Takkeshubhankar tawde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
drashti dhami baby bump

बेबी बम्प दिखावा असल्याचा लोकांचा दावा, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गरोदर असल्याचं केलं सिद्ध, म्हणाली, "हा पुरावा आहे की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.