शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

त्वचेचा कॅन्सर झालेल्या आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं अन्…; मुंबईतील धक्कादायक घटना

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 25, 2025 | 10:56 am
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Mumbai Crime News

त्वचेचा कॅन्सर झालेल्या आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं अन्…; मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Crime News : ऐकावं ते नवलंच!. हो. आजकाल सतत कानावर वाईट बातम्या या येतच आहेत. कोणाबरोबर वाईट घडलं, कोणाचा अपघाती मृत्त्यू झाला तर कोणाचा रेप झाला, असं काही ना काही ऐकू येतं आणि वाटत खरंच आपल्यातली माणुसकी संपली की काय?. माणुसकी संपली हे ऐकून धक्का बसेल वा घृणा येईल अशी घटना घडलीय. हो. ज्या आजीने तळहाताच्या फोडासारखे जपले तिला जेव्हा आपली गरज असताना वरचेवर सोडणं हे लज्जास्पदच आहे. इतकंच नाही तर वाऱ्यावर म्हणजे कचराकुंडीत. ऐकून अंगावर काटाच आला. त्वचेचा कर्करोग हे कारण ठरलं. आपल्या आजीला त्वचेचा कर्करोग झाला म्हणून नातवाने तिला कचराकुंडीत टाकलं. खरंच त्याच्यातील माणुसकी संपली का?… असा सवाल त्याला धरून करावा वाटतो.

६० वर्षीय यशोदा गायकवाड यांना त्वचेचा कॅन्सर होता. यामुळे त्यांच्या नातवाने त्यांना मुंबई उपनगरमधील आरे येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं. यशोदा गायकवाड या मालाडमधील रहिवाशी आहेत. त्या नातावासह वास्तव्यास होत्या. सदर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी यशोदा गायकवाड यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. सध्या कूपर रुग्णालयात यशोदा गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच यशोदा गायकवाड यांच्या नातेवाईकांचा शोध सध्या पोलिसांकडून घेण्यात येत आहे. अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

आणखी वाचा – “म्हातारपणात वेड लागलं, सूनेचंही कौतुक करा”, म्हणणाऱ्यांना बिग बींनी फटकारलं, म्हणाले, “गांजा फुकून…”

यशोदा गायकवाड या त्यांच्या नातवासह मालाड परिसरात राहतात, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली असून पोलीस त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेत आहेत. यशोदा गायकवाड यांना बोलता येत नाही. त्या फक्त नातू-नातू असं सांगत आहे. त्यामुळे आरे पोलिसांना वृद्ध आजीचा कुटुंबियांचा शोध घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. आरे परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तपास करत आरे पोलीस वृद्ध आजीच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत, अशी माहिती आरे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.

आणखी वाचा – अलका कुबल यांचा जावयही आहे पायलट, विमान अपघातात त्याचा मित्र गेला अन्…; सांगितला ‘तो’ प्रसंग

हॉस्पिटलमध्ये सुरु असलेल्या उपचारादरम्यान यशोदा यांना घरातून बाहेर काढत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेऊन टाकलं. यावेळी त्या नातवाला इतकी वर्ष ज्या बाईने सांभाळलं, मोठं केलं याची जाणीवही झाली नसेल का?, त्या निर्दयी हृदयाने केलेलं कृत्य त्याला कधी माफ करु शकणार नाही.

Tags: Cancer patientMumbai Crime Newstrending news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
alka kubal talk about industry

“चांगलं असेल त्याच्याच मागे इंडस्ट्री असते”, रडूबाई म्हणून टीका, इंडस्ट्रीबाबत बोलल्या अलका कुबल, रडण्यावर मीम्स येतात तेव्हा...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.