रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रत्यक्ष समोर नसलात तरी…”, आजोबांच्या आठवणीत शशांक केतकर भावुक, म्हणाला, “तुमचा १००वा वाढदिवस…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 13, 2025 | 5:25 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actor Shashank Ketkar shared an emotional post on the occasion of his grandfather 100th birthday

आजोबांच्या १००व्या वाढदिवसानिमित्त शशांक केतकर भावुक, खास पोस्ट केली शेअर

झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. या मालिकेतील त्याची श्री ही भूमिका चांगलीच गाजली. मालिकाविश्वात महत्त्वपूर्ण कामगिरी करत शशांकने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. याशिवाय त्याने अनेक चित्रपट, वेबसीरिज, नाटक यांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. सध्या शशांक ‘मुरांबा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच काही ना काही शेअर करत असतो. बरेचदा तो त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसतो. कुटुंबाबाबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो तसेच त्यांच्याबरोबरचे अनुभव तो शेअर करत असतो. (shashank ketkar emotional post)

अशातच त्याने आजोबांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याने आजोबांचा जुना फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच आज तुम्ही आठवण येत असल्याचेही त्याने म्हटलं आहे. या पोस्टमध्ये शशांकने असं म्हटलं आहे की, “आज माझ्या आजोबांचा १०० वा वाढदिवस. तुम्ही जरी प्रत्यक्ष समोर नसलात, तरी तुमची आठवण रोज येते. आमच्या पाठीशी तुमचे आशीर्वाद कायम राहूदे”. तसंच या पोस्टसह त्याने अनेक दु:खी इमोजी जोडलेले आहेत. त्यामुळे अभिनेता आपल्या दिवंगत आजोबांच्या आठवणीत भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात डोहाळे जेवण, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

शशांक सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपल्या वैयक्तिक घटना शेअर करत असतोच. याशिवाय तो अनेक सामाजिक व्हीसी राजकीय विषयांवरही अगदी बिनधास्त व बेधडकपणे आपली मतं मांडतो. त्याच्या या मतांना अनेकदा यशही आलेले पाहायला मिळाले आहे. अभिनेत्याने रस्ते, रस्त्यावरील खड्डे, कचरा, अनधिकृत बांधकाम, याविषयी अनेकदा भाष्य केलं असून त्याने कार्यवाहीची मागणीही केली आहे. त्याचबरोबर त्याच्या या मागणीअआ यशही आले आहे.

आणखी वाचा – “बाईनेच बाईला पाठिंबा दिला पाहिजे आणि…”, ऐश्वर्या नारकरांचं ट्रोलिंगबाबत स्पष्ट मत, म्हणाल्या, ” सीतेने कंचुकी वापरल्याच ना…”

दरम्यान, अभिनेता लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. २०२५ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने ही गुडन्यूज सर्वांबरोबर शेअर केली. शशांक २०१७ साली प्रियांका ढवळेबरोबर लग्नबंधनात अडकला. त्यांना ऋग्वेद नावाचा मुलगाही आहे. मुलाबरोबरचे अनेक फोटो व गमतीशीर व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. “२०२५ चं स्वागत यापेक्षा छान बातमीने होऊच शकत नाही” असं म्हणत त्याने ही खुशखबर शेअर केली होती.

Tags: shashank ketkar emotional postshashank ketkar grandfather 100th birthdayshashank ketkar grandfather emotional post
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Navri Mile Hitlerla serial update Aj feeling insecure for leela new friend see the details

लीलाचा नवीन मित्र एजेंना पाहवेना, बायकोच्या 'त्या' वागण्यामुळे राग अनावर, प्रेम आणखी बहरणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.