शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी साफ नकारच दिला होता पण…”, ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या परीक्षणासाठी संकर्षण कऱ्हाडेचा होता नकार, म्हणाला, “परिक्षकाचा मान…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 22, 2024 | 12:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi Actor Sankarshan Karhade shared post about his 'Drama Juniors' show.

“मी साफ नकारच दिला होता पण...”, ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या परीक्षणासाठी संकर्षण कऱ्हाडेचा होता नकार, म्हणाला, "परिक्षकाचा मान..."

लेखक, कवी, अभिनेता, दिग्दर्शक, सूत्रसंचालन अशा अनेक क्षेत्रात मुशाफिरी करणारा संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा कलाकार आहे. नाटक, मालिका, चित्रपट त्याचबरोबर कवितांचे कार्यक्रम अशा माध्यमातून त्याने आपल्या कलेची चुणूक दाखवून दिली. नाटक, मालिका व चित्रपटांत अभिनय करत मनोरंजन करणारा हा अभिनेता लवकरच परिक्षकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झी मराठी वाहिनीवर लवकरच ‘ड्रामा ज्युनिअर्स’ हा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या कार्यक्रमात संकर्षण परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या कार्यक्रमात त्याच्याबरोबर अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील असणार आहे. मात या कार्यक्रमाच्या परीक्षणासाठी संकर्षणने आधी नकार दिला होता.याबद्दल स्वत: संकर्षणने एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “पहिल्यांदाच परीक्षक. ‘ड्रामा जूनियर्स’. खरं सांगू का, मी साफ नकोच म्हणलं होतं. वाटलं की, मी का आणि काय कुणाचं परिक्षण करणार? पण झी मराठीने फार विश्वासाने ही जबाबदारी दिली आहे. २००८ साली स्पर्धक म्हणून झी मराठीनेच संधी दिली होती आणि आता त्यांनीच परिक्षकाचा मान दिला आहे. विश्वास ठेवा, मी हेही काम अत्यंत प्रामाणिकपणे करेन. तुमची साथ आहे ना? आहेच असं प्रेमाने व हक्काने गृहीत धरतो. कामाला लागतो”

आणखी वाचा – “मला रंग, उंची आवाजावरुन हिणवण्यात आले अन्…”, जुई गडकरीचा इंडस्ट्रीत काम करण्यावरुन मोठा खुलासा, म्हणाली, “काळी आली असं बोलले…”

संकर्षणचे रंगभूमीवर सध्या ‘नियम अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ या नाटकांसह त्याचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रमही सुरू आहे. त्याच्या या नाटक व कवितांच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसादही मिळत आहे. तसेच आता या नवीन कार्यक्रमासाठी त्याचे अनेक चाहते उत्सुक आहेत.    

आणखी वाचा – नवऱ्याचा बॉलिवूड चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचली तितीक्षा तावडे, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आपलं स्वप्न…”

दरम्यान, ‘ड्रामा जूनियर्स’ या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी झी मराठी वाहिनीचा अनेक वर्षांपासूनचा लोकप्रिय चेहरा झळकणार आहे. हा लोकप्रिय चेहरा म्हणजेच अभिनेत्री श्रेया बुगडे. त्यामुळे आता या नवीन कार्यक्रमासाठी अनेक चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags: marathi actormarathi entertainment newssankarshan karhade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Mugdha Vaishampayan shared a video of her singing on the occasion completing six months of marriage

Video : सासरी गावातल्या मंडळींसमोर भजन गाण्यात मग्न झाली मुग्धा वैशंपायन, गायिकेच्या संस्कारांचं कौतुक, म्हणाले, "इतका साधेपणा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.