शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अजूनही मी BMCमध्ये नोकरी करतो आणि…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितली सत्य परिस्थिती, म्हणाला, “काम मागणं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 18, 2025 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sandesh Jadhav Interview

"अजूनही मी BMCमध्ये नोकरी करतो आणि…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितली सत्य परिस्थिती, म्हणाला, "काम मागणं…"

Sandesh Jadhav Interview : चित्रपट असो वा मालिका पोलीस इन्स्पेक्टर म्हटलं की एक नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे संदेश जाधव. बरेचदा एकाच धाटणीच्या भूमिका सतत केल्याने तो कलाकार त्या साच्यात अडकला जातो आणि प्रेक्षकांच्या नजरेतही तो साचेबद्ध होऊन जातो. असंच काहीस झालंय ते म्हणजे अभिनेते संदेश जाधव यांचं. अनेक नाटक, चित्रपट यांमध्ये मत्त्वपूर्ण भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. रंगमंचावर त्यांनी विशेष भर दिला. तर केवळ मराठी नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली. मात्र आजही संदेश जाधव यांना हवी तशी प्रसिद्धी मिळालेली नाही. यामागचं नेमकं कारण काय आहे याबद्दल स्वतः संदेश जाधव यांनी भाष्य केलं आहे.

संदेश जाधव यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या करिअरबाबत अनेक खुलासे केले. त्यावेळी हवी तशी प्रसिद्धी, लोकप्रियता मिळाली नाही याबाबत प्रश्न विचारताच संदेश जाधव म्हणाले, “खरं सांगायचं तर बृहन्मुंबई महानगर पालिकेत मी अजूनही कामाला आहे. नोकरी सांभाळत करिअरही सुरु आहे. माझं बालपण हे मुंबईतील एका बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या वस्तीत गेलं आहे. त्यामुळे तिथे राहत असताना अगदी लहानपणापासून मला अभिनयाची आवड निर्माण झाली. चाळीत राहत असल्याने तिथे अनेक कार्यक्रम व्हायचे आणि त्यात सहभाग घेण्यापासून ही आवड अधिक दृढ होत गेली”.

आणखी वाचा – अखेर प्रतिक्षा संपली! सूजर चव्हाणचा ‘झापुक झुपूक’चा टीझर प्रदर्शित, डायलॉगबाजीची चर्चा, प्रेक्षकांना कसा वाटला?

पुढे ते म्हणाले, “त्यानंतर कॉलेजमध्ये असताना एकांकिका, नाटक यांत जाणं व्हायचं. आणि कॉलेजनंतर मी बृहन्मुंबई महानगर पालिकेत कामाला लागलो. तिथे असतानाही नाटकात जात होतो. इतकंच नाही तर कामावरही नाटकांच्या स्पर्धा व्हायच्या त्यातही जायची त्यामुळे माझं नाव झालं. हळूहळू मी नाटक करायला लागलो. त्यानंतर मी एक चित्रपट केला डोंबिवली फास्ट. या चित्रपटामुळे माझं महाराष्ट्रात बरंच नाव झालं. बऱ्याच लोकांनी त्यानंतर मला सल्ला दिला की तू याकडे लक्ष दे. पण नोकरीमुळे मला अभिनयाकडे तितकासा वेळ देणं जमलंच नाही”.

आणखी वाचा – मराठी मालिकांना त्याच त्याच लेखकांची नावं का दिसतात?, ‘ठरलं तर मग’ फेम शिल्पा नवलकर म्हणाल्या, “वेगळंच कुणीतरी…”

ते असंही म्हणाले की, “माझं काम घेऊन एखाद्याकडे जाणं हे मी कधीच केलं नाही. त्याच्यामुळे माझी ओळख लोकांना झाली नसावी. मला माझं मार्केटिंग करणं तितकंसं जमलं नाही. सोशल मीडियावरही मी तितकासा सक्रिय नाही आहे, जे काही माझं सोशल मीडिया आहे ते माझी मुलगी पाहते. या सगळ्यात मी फार ऍक्टिव्ह नसल्याने मी मागे आहे. संदेश जाधव हे नाव लोकांना माहित आहे पण मी खूप काही फेमस नाही. केवळ इन्स्पेक्टरच्या भूमिकांमुळे माझी ओळख आहे असं नाही तर एका चित्रपटात मी तृतीयपंथीचा अभिनय केला होता ही भूमिका सुद्धा एक वेगळी ओळख आहे”.

Tags: marathi actorsandesh jadhavSandesh Jadhav Interview
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Sunita Williams Return To Earth

नऊ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या सुनीता विल्यम्स, सेलिब्रिटींचा आनंदही गगनात मावेना, आर.माधवन म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.