Sunita Williams Return To Earth : अवकाशात नऊ महिने राहिल्यानंतर सुनीता विल्यम्स १९ मार्च रोजी सकाळी ३.३० वाजता स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळ यानात पृथ्वीवर परतल्या आहेत. संपूर्ण जग सुनीता यांच्या घरी येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आणि जेव्हा ती परत आली, तेव्हा प्रत्येकाने सुटकेचा श्वास सोडला. आणि तिच्या येण्याने पृथ्वीवर आनंदाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळालं. काहींनी तर सुनीता सुखरुप पोहचावी म्हणून उपवास केले, पूजा-अर्चा केली. अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर येताच सगळ्यांचा आनंदच गगनात मावेनासा झालेला पाहायला मिळाला. अभिनेता आर माधवनही त्याचा आनंद रोखू शकला नाही आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने प्रेमाचा वर्षाव केला.
सुनीता विल्यम्सच्या लँडिंगचा व्हिडीओ शेअर करताना अभिनेता आर माधवनने लिहिले, “आमच्या प्रिय सुनीता विल्यम्सचे पृथ्वीवर स्वागत आहे. देवाने आमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत. आपणास सुरक्षित आणि हसत हसत आलेले पाहून खूप आनंद झाला. अवकाशात २६० दिवसांहून अधिक काळ राहून परतणे ही देवाची कृपा आणि कोट्यावधी लोकांची प्रार्थना आहे, जी देवाने ऐकून हा प्रवास सुखरुप केला. स्पेसएक्स डॅल्कन 9, नासा आणि संपूर्ण क्रूने बरेच चांगले काम केले आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देवो”.
आणखी वाचा – हिंदू असूनही एआर रेहमान यांनी मुस्लिम धर्म का स्वीकारला?, ‘त्या’ एका कारणामुळे मोठा निर्णय घेतला अन्…
सुनीता विल्यम्स आणि ब्रूझ विल्मोर दोघेही माजी नौदल पायलट आहेत. त्यांनी गेल्या वर्षी ५ जून २०२४ रोजी ऑर्बिटल लॅबमध्ये उड्डाण केले. दोघेही ८ दिवसांच्या मिशनवर गेले परंतु तांत्रिक समस्या आणि वेळापत्रकात झालेल्या काही बदलांमुळे तेथे अडकले. परंतु नऊ महिन्यांनंतर, ५९ वर्षांची सुनिता आणि ६२ वर्षांचे बुच पृथ्वीवर परतले आहेत.
आर माधवनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी ‘रॉकेट्री: द नबी इफेक्ट’ या चित्रपटात वैज्ञानिक नंबी नारायणनची भूमिका साकारली. याव्यतिरिक्त, ते अखेरचे ‘द रेल्वे मॅन’ मध्ये दिसले होते, ज्यात केके मेनन आणि बेबिल या महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. ते आता सिद्धार्थ आणि नयंतारा यांच्यासह ‘टेस्ट’ या चित्रपटात दिसणार आहेत, जो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.