पुण्यातील एफसी रोडवरील नामांकीत हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला अन् एकच खळबळ माजली. यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, हॉटेलमधील वॉशरुमममध्ये टॉयलेटजवळ बसून काही तरुणी ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येत आहे. यावर आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेते, दिग्दर्शक पिट्या भाई म्हणजे रमेश परदेशी यांनीही यासंदर्भात पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
रमेश परदेशी यांनी काही महिन्यांपूर्वी पुण्यातील वेताळ टेकडीवरील नशेच्या आहारी गेलेल्या तरुणींचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी त्यांनी आजची तरुणाई कशाप्रकारे नशेच्या आहारी जाऊन चुकीच्या मार्गाला जात आहे. यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अशातच त्यांनी या व्हायरल व्हिडीओनंतर एकदा आपली संतप्त भूमिका व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – आता युद्ध पेटणार! राजाध्यक्ष कुटुंबाला नष्ट करण्यासाठी विरोचक तयार, देवी आईच्या लेकी वाचवणार का?
रमेश परदेशी हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते अनेकदा राजकीय व समाजिक मतं व्यक्त करत असतात. अशातच त्यांनी या व्हायरल व्हिडीओवर त्यांची संतप्त भूमिका व्यक्त करताना असं म्हटलं आहे की, “व्यसन, ड्रग्ज या गोष्टी आधी शहराच्या वेशीवर होत्या, मग टेकड्या आणि आता मध्यवस्तीत आल्या आहेत. घरापर्यंत किंवा घरात यायची वाट पाहणार का?” तसेच यापुढे त्यांनी या पोस्टद्वारे पुणेकरांना “आपण पुणेकर म्हणून काही करणार की नाही मी तर करणार तुम्ही?” असा प्रश्नही विचारला आहे.
त्यांच्या या पोस्टखाली अनेकांनी त्यांना या संदर्भात काहीही मदत लागली तर करण्याचे आवाहन दिले आहे. परप्रांतीय विद्यार्थी यांच्यामुळ हे सगळं पसरलं आहे, विकणारे पाहिले शोधा बाकी सगळे मिळून जातील, जो पर्यंत कुणी पुढे येत नाही तो पर्यंत हे असच चालायचं” अशा अनेक कमेंट्स करत अनेक चाहत्यांनी त्यांना या प्रकरणी शोध घेण्याचे व मदत करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी पोलिस प्रशासन, स्थानिक व्यवस्था काय निर्णय घेणार?, या प्रकरणात गुंतलेल्या मुलांची चौकशी केली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.