गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“उगाच माझ्या जीवाशी खेळ का?”, बायको गाडी चालवतानाचा व्हिडीओ शेअर करत कुशल बद्रिकेची पोस्ट, भडकून म्हणाली, “लगेचच डिलीट…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 20, 2024 | 4:52 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actor Kushal Badrike shared the video of his wife driving on social media

"उगाच माझ्या जीवाशी खेळ का?", बायको गाडी चालवतानाचा व्हिडीओ शेअर करत कुशल बद्रिकेची पोस्ट, भडकून म्हणाली, "लगेचच डिलीट..."

अभिनेता कुशल बद्रिके हा पडद्यावर जितका विनोदी आहे. तितकाच तो त्याच्या खऱ्या आयुष्यातदेखील तितकाच गंमतीशीर आहे आणि याचा प्रत्यय वेळोवेळी आलाच आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल अवघ्या महराष्ट्रात लोकप्रिय झाला आहे. या शोमधून विनोदी स्किट्स करत त्याने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. कुशल हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच कुशलने शेअर केलेल्या एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. (Kushal Badrike On Instagram)

कुशलचा सुयनाबरोबर प्रेमविवाह झाला असून त्यांच्यात नवरा-बायकोपेक्षा मित्र-मैत्रिणीचे नाते असल्याचे कायमचं पाहायला मिळाले आहे आणि हे खास नाते त्यांच्या अनेक व्हिडीओमधून दिसते. कुशल आपल्या पत्नीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच त्याने नुकताच एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – लग्नानंतर प्रथमेश लघाटेचा एकट्याने विमान प्रवास, बायकोच्या आठवणीत व्याकुळ, विमानातला फोटो पोस्ट करत म्हणाला, “मुग्धा…”

कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्याची पत्नी गाडी चालवत आहे आणि ती गाडी चालवत असताना ती नृत्याचा सराव करत आहे. सुनयना ही एक उत्तम कथ्थक नृत्यांगना असल्याचे सर्वांनाच माहीत आहे आणि याच संबंधित ती गाडी चालवत असताना हातांनी गाण्याच्या तालाचा ठेका धरत आहे. कुशलने त्याच्या पत्नीचा गाडी चालवतानाचा व्हिडीओ शेअर करत “मी काय म्हणतो, उगाच माझ्या जीवाशी खेळ का? मला तरी गाडी चालवू दे” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – अभिनयक्षेत्रात काम करण्यापूर्वी गौतमी देशपांडे करायची नोकरी,  त्याच ऑफिसमध्ये पुन्हा गेली अन्…; स्वतःचा डेस्कही दाखवला, म्हणाली, “पाच वर्ष…”

पण खरी गंमत तर यापुढे आहे. कुशलन हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताच त्याच्या बायकोने त्याला रागावून “हा व्हिडीओ ताबडतोब डिलीट कर” असं म्हटलं आहे. पण कुशलनेही “मी व्हिडीओ डिलिट करणार नाही” असं म्हणत तिला उत्तर दिलं आहे. यावर कुशलची बायको त्याच्यावर चांगलीच रागावली असल्याचे पाहायला मिळत आहे.

Tags: entertainment newskushal badrikemarathi actormarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsSunayana Badrikeकुशल बद्रिकेमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीमराठी विनोदी अभिनेतासुनयना बद्रिके
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
shoaib Malik and sania Mirza Divorce

सानिया मिर्झा व शोएब मलिक यांचा घटस्फोट, चर्चा ठरल्या खऱ्या, पाकिस्तानी अभिनेत्रीशी लग्न तेही थाटात अन्..

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.