शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लतादिदींच्या पार्थिवाजवळ फुंकर मारुन थुंकला आणि…”, किरण मानेंनी शाहरुख खानसाठी केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाले, “तू पाकिस्तानमधील…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 2, 2023 | 12:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kiran Mane On Shahrukh Khan

“लतादिदींच्या पार्थिवाजवळ फुंकर मारुन थुंकला आणि…”, किरण मानेंनी शाहरुख खानसाठी केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाले, “तू पाकिस्तानमधील…”

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचे जगभरात असंख्य चाहते आहेत. शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये कलाकार मंडळीही मागे नाहीत. बरेच कलाकारही शाहरुखचे चाहते असून नेहमीच ते त्याच्याबद्दलची पोस्ट करत असतात. अशातच आज किंग खानचा वाढदिवस आहे, आणि किंग खानच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मराठमोळा अभिनेता किरण माने हा शाहरुख खानचा खूप मोठा चाहता आहे. शाहरुखचा जवान चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा देखील किरण माने याने फेसबुक पोस्ट लिहीत शाहरुखचं कौतुक केलं होतं. (Kiran Mane On Shahrukh Khan)

आज शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त किरण माने यांनी हटके अंदाजात फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. किरण माने म्हणाला, “शारख्या, त्यांना वाटलं सगळं जग आपल्या बापाचं हाय. आपन ‘बायकाॅट’ म्हन्लं की मानूस इंडस्ट्रीतनं आऊट ! आमच्या इरोधात बोलाल तर काम काढून घिवू. कोन पिच्चरला येनार नाय अशी व्यवस्था करू. ‘हम करे सो कायदा’ म्हनत त्यांनी गेमा करायला सुरूवात केली. कलाकारांमधली जी दोनचार टाळकी विरोधात बोलत होती, ती बी भेदरुन गप झाली. मग काय, बायकाॅट गॅंगला वाटलं ‘साला आपुनईच भगवान है!”

आणखी वाचा – “माझ्या हजारो चुका…”, ‘आई कुठे…’ फेम अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाली, “सगळंच संपलं…”

“या गॅंगच्या तू कायम टारगेटवर होतास. तू पाकिस्तानधार्जिना आहेस असं खोटं पसरवलं. तुझ्या मुलाला खोट्या प्रकरनात अडकवलं गेलं तवा तर गॅंगनं हैदोस घातला. लतादिदींच्या पार्थिवाजवळ फुंकर मारल्यावर ‘तू थुंकला’ असा कांगावा करत धिंगाना घातला. लै मोठ्या गॅपनंतर तू आलास. नेहमीच्या स्वॅगमधी चालत, कापणारी नजर रोखत, केस उडवत, फूल्ल श्टाईल में ! बायकाॅट गॅंग चेकाळली. ‘आता याला रस्त्यावर आनूया, लै माज करतोय स्स्साला’ म्हनत मोहिम सुरू केली. आल्याआल्या तू असा ‘पठाण’ लावला, का सात-आठशे करोड कमावल्याशिवाय काढलाच नाहीस. बायकाॅट गॅंग कळवळून बोंबलायला लागली. बाकी सगळं जग धुंद होऊन नाचत होतं “झुमे जो पठाण, मेरी जान, महफिल ही लूट जाये.”

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

“कम्बख़्त कारस्थानी गॅंग धक्क्यातनं सावरेपर्यन्त ‘जवान’ लावलास, खाडकन मुस्काडात देत म्हन्लास, “बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर” परत हजार करोडचा दांडगा धुमाकूळ! शारख्या, माणूस म्हनून तू लै लै लै ग्रेट हायेस. तुझं समाजभान, तुझी बुद्धीमत्ता, तुझं वाचन, तुझा सेन्स ऑफ ह्यूमर आन् सगळ्यात महत्त्वाचं, जे मी लै ‘रिलेट’ करतो, तो म्हन्जे संकटावर उल्टी चाल करून जानं, निधड्या छातीनं. ज्या काळात सत्ताधार्‍यांविरोधात एक शब्दबी उच्चारनं म्हन्जे काम हातातनं घालवनं, नायतर मागे ईडी लावुन घेनं, लैच झालं तर तुरूंगात जानं. त्या दहशतीच्या काळात तू थेट सिनेमातनं डंके की चोटपर भारतीय नागरीकांना सांगीतलंस, “जात-पात-धर्म-संप्रदाय के लिए व्होट देने के बजाय, जो आपसे व्होट माॅंगने आए, आप उससे सवाल पुछो ! पुछो उससे के अगले पाॅंच साल तक तुम मेरे लिए क्या करोगे? मेरे बच्चोंकी शिक्षा के लिए क्या करोगे? मुझे नौकरी देने के लिए क्या करोगे?? मै अगर बिमार पड गया तो मेरे परिवार के लिए क्या करोगे??? अगले पाॅंच साल तक तुम मेरे देश को आगे बढाने के लिए क्या करोगे, पुछो उससे.”

आणखी वाचा – “एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?”, मराठा आरक्षणावरून केतकी चितळेने व्यक्त केली नाराजी, म्हणाली, “सामान्य माणसाला…”

“शारख्या, आज तुझा बड्डे ! लै लै लै जग. आम्हाला बख्खळ आनंद दे. प्रेरना दे. मनोरंजन, स्वॅग आनि समाजभान याचा काॅम्बो असलेला लाभावा ही आमची ‘मन्नत’ खुदानं पुरी केलेलीच हाय. असेच नादखुळा पिच्चर आनून तू आम्हाला ‘जन्नत’ दाखव. लब्यू शारख्या” अशा अनोख्या अंदाजात किरण माने यांनी शाहरुख खानला शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: entertainmentkiran manemarathi actormarathi serialshahrukh khanshahrukh khan birthday
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shahrukh Khan Dunki first teaser Out

Dunki Teaser : तिच स्टाईल, तोच अंदाज अन्…; शाहरुख खानच्या 'डंकी'च्या टीझरने जिंकलं प्रेक्षकांचं मन, तुम्ही पाहिलात का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.