मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अभिनेता चांगलाच लोकप्रिय झाला. वर्षभरापूर्वी हार्दिक जोशीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. २४ डिसेंबर रोजी हार्दिक जोशीच्या वहिनीचं निधन झालं. यावेळी त्याने स्वत: भावूक पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली होती. हार्दिक जोशीने त्याच्या वहिनीबरोबरचे फोटो शेअर करत वाहिनीच्या निधनाबद्दलची माहिती दिली होती. यावेळी हार्दिकने भावुक पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. डोळ्यात पाणी यावी, अशी ही पोस्ट पाहून नेटकरही हळहळले होते. (Hardeek Joshi emotional post for elder brother wife)
अशातच आता हार्दिक जोशी पुन्हा एकदा आपल्या वाहिनीच्या आठवणीत भावुक झाला आहे. वहिनीच्या निधनाला वर्ष होताच हार्दिक जोशीने वहिनीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हार्दिकने त्याच्या लग्नातील वहिनीबरोबरचे हे काही खास फोटो शेअर केले आहेत. हार्दिकने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये त्याची वहिनी त्याला ओवाळतानाचे पाहायला मिळत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये हार्दिकच्या गालाला हळदी लागली असून तो आपल्या वहिनीबरोबर नाचताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – खोटं रक्त, खोटी जखम अन्…; असा शूट झाला ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील ‘तो’ सीन, लीलाने दाखवली खास झलक
हे दोन फोटो शेअर करत हार्दिकने असं म्हटलं आहे की, “ज्योती वहिनी… आज २४ नोव्हेंबर. तुला जाऊन एक वर्ष पुर्ण झालं. पण आजही तुझी उणीव सतत जाणवते आणि ती कायम जाणवत राहणार, तुझ्या गोड आठवणी, तुझं अस्तित्व आणि तुझा आशीर्वाद कायम आमच्या सोबत आहे आणि कायम आमच्या सोबत राहणार. नेहमी तुझी आठवण येते आणि तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे”. हार्दिकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी कमेंट्समध्ये त्यांच्या भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा – “…म्हणून पळून जाऊन केलं लग्न”, ‘तुला शिकवीन…’ फेम चारुहास यांनी सांगितला त्यांच्या लग्नाचा खास किस्सा
दरम्यान, वहिनीच्या निधनानंतर हार्दिकने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत असं म्हटलं होतं की, “ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीस. पण तुझं अस्तित्व आमच्यात कायम राहील. तू सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणून माझ्या सोबत पाठीशी होतीस. तशीच कायम राहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल. माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको”.