‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत आहे. मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारत आहे. दोघांची मालिकेत मनाविरुद्ध सुरु झालेली प्रेमकहाणी कोणतं वळण घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मालिकेतील कलाकार हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. (Navri Mile Hitlarla BTS Video)
त्याचबरोबर मालिकेतील काही धमाल किस्से व पडद्यामागच्या काही रंजक कथाही शेअर करत असतात. अशातच मालिकेतील लीलाने तिच्या सोशल मीडियाद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमधून तिने मालिकेचे शुटींग नेमके कसे केले जाते? याची खास झलक दाखवली आहे. मालिकेत बऱ्याचदा काही अपघाताचे सीन्स शूट केले जातात. हे अपघाताचे शूटिंग खरं नसलं तरी प्रेक्षकांना ते खरे वाटतात आणि यामागे कलाकार व तंत्रज्ञ मंडळींची अपार मेहनत असते. असंच नवरी मिळे हिटलरला मालिकेत लीला व रेवती यांच्या अपघात झाल्याचे पाहायला मिळाले आणि हा सीन नेमका कसा शूट झाला याचा लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरीने खास व्हिडीओ शेअर केला आहे.
वल्लरीने तिच्या इस्टाग्रामवर हा खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये त्या दोघी टेम्पोचा धक्का लागताच एका गादीवर पडतात. प्रत्यक्षात मात्र त्या रस्त्यावर पडल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दोघींना जबर जखम होते आणि त्यांच्या हाताला रक्त लागल्याचे मालिकेत पाहायला मिळाले. मात्र प्रत्यक्षात त्यांना खोटे रक्त लावल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांचा हा अपघातचा सीन उत्तम प्रकारे चित्रित करण्यासाठी झाडावर अआणि इतर अनेक ठिकाणी कॅमेरा लावल्याचेही या व्हिडीओमधून दिसत आहे. एकूणच कलाकार व तंत्रज्ञ लोकांची एखाद्या सीनसाठीची मेहनत या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सत्य घटना पर आधारित असं कॅप्शन देत लीलाने हा BTS व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – “…म्हणून पळून जाऊन केलं लग्न”, ‘तुला शिकवीन…’ फेम चारुहास यांनी सांगितला त्यांच्या लग्नाचा खास किस्सा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एजेबरोबर ठरलेले लग्न मोडले, याचा त्रास होत असल्याचे सांगत श्वेता एजेसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे एजेला तुरुंगातदेखील जावे लागते. त्यांनंतर एजे तिच्या लग्नाची जबाबदारी घेतो आणि तिचे लग्न यशबरोबर ठरवतो. मात्र, यशचे प्रेम लीलाची बहीण रेवतीवर असते. लीला रेवतीची समजूत काढते आणि तिचे प्रेम यशवर आहे, हे एजेला सांगण्यासाठी तयार करते. तेव्हा त्या एजेकडे जात असताना लीला आणि रेवतीचा अपघात होतो.