शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुला जाऊन वर्ष पूर्ण झालं पण…”, दिवंगत वहिनीच्या आठवणीत हार्दिक जोशी भावुक, म्हणाला, “तुझं अस्तित्व आणि तुझा आशीर्वाद…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 24, 2024 | 12:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Hardeek Joshi shared an emotional post on the one year of his elder brother wife death

वहिनीच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होताच हार्दिक जोशीने शेअर केली भावुक पोस्ट, उणीव भासत असल्याची भावना केली व्यक्त

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अभिनेता चांगलाच लोकप्रिय झाला. वर्षभरापूर्वी हार्दिक जोशीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. २४ डिसेंबर रोजी हार्दिक जोशीच्या वहिनीचं निधन झालं. यावेळी त्याने स्वत: भावूक पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली होती. हार्दिक जोशीने त्याच्या वहिनीबरोबरचे फोटो शेअर करत वाहिनीच्या निधनाबद्दलची माहिती दिली होती. यावेळी हार्दिकने भावुक पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. डोळ्यात पाणी यावी, अशी ही पोस्ट पाहून नेटकरही हळहळले होते. (Hardeek Joshi emotional post for elder brother wife)

अशातच आता हार्दिक जोशी पुन्हा एकदा आपल्या वाहिनीच्या आठवणीत भावुक झाला आहे. वहिनीच्या निधनाला वर्ष होताच हार्दिक जोशीने वहिनीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हार्दिकने त्याच्या लग्नातील वहिनीबरोबरचे हे काही खास फोटो शेअर केले आहेत. हार्दिकने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये त्याची वहिनी त्याला ओवाळतानाचे पाहायला मिळत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये हार्दिकच्या गालाला हळदी लागली असून तो आपल्या वहिनीबरोबर नाचताना पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by HARDEEK JOSHII (@hardeek_joshi)

आणखी वाचा – खोटं रक्त, खोटी जखम अन्…; असा शूट झाला ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील ‘तो’ सीन, लीलाने दाखवली खास झलक

हे दोन फोटो शेअर करत हार्दिकने असं म्हटलं आहे की, “ज्योती वहिनी… आज २४ नोव्हेंबर. तुला जाऊन एक वर्ष पुर्ण झालं. पण आजही तुझी उणीव सतत जाणवते आणि ती कायम जाणवत राहणार, तुझ्या गोड आठवणी, तुझं अस्तित्व आणि तुझा आशीर्वाद कायम आमच्या सोबत आहे आणि कायम आमच्या सोबत राहणार. नेहमी तुझी आठवण येते आणि तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे”. हार्दिकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी कमेंट्समध्ये त्यांच्या भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा – “…म्हणून पळून जाऊन केलं लग्न”, ‘तुला शिकवीन…’ फेम चारुहास यांनी सांगितला त्यांच्या लग्नाचा खास किस्सा

दरम्यान, वहिनीच्या निधनानंतर हार्दिकने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत असं म्हटलं होतं की, “ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीस. पण तुझं अस्तित्व आमच्यात कायम राहील. तू सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणून माझ्या सोबत पाठीशी होतीस. तशीच कायम राहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल. माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको”.

Tags: Hardeek Josh elder brother wifeHardeek Joshi emotional post for elder brother wifeHardeek Joshi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Marathi actress Tejaswini Pandit expressed her reaction by posting a photo of Raj Thackeray after the results of the assembly elections 2024

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, राज ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाली, “आमचा राजा नाही, महाराष्ट्र...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.