रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एकच काम, काहीच नवीन सुचत नव्हतं अन्…”, गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्याचं पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाला, “माझ्याकडून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 28, 2024 | 4:35 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Gaurav More On Maharashtrachi Hasyajatra

"एकच काम, काहीच नवीन सुचत नव्हतं अन्...", गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाला, "माझ्याकडून..."

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं खळखळवून मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमामुळे आजवर अनेक कलाकारांना मोठं होण्याची संधी मिळाली. हास्यजत्रेमुळे या कार्यक्रमातील कलाकार घराघरांत पोहोचले. या कार्यक्रमामुळे कायमच चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. गौरव मोरेने काही महिन्यांपूर्वी या कार्यक्रमाला रामराम ठोकला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला निरोप दिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्याला बरंच ट्रोल केलं आणि हास्यजत्रा सोडल्याने नाराजी दर्शिविली. (Gaurav More On Maharashtrachi Hasyajatra)

अशातच गौरव मोरेने नुकतीच ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्याने हास्यजत्रा सोडण्याबद्दल भाष्य केलं आहे. हिंदी इंडस्ट्रीत गेल्यावर गौरवला ट्रोल केलं गेलं. त्यावेळी एका नेटकऱ्याने हास्यजत्रा सोडण्यावरुन केलेल्या कमेंटवर गौरव मोरेने उत्तर देत यामागे काही कारण असतात, दादा, असं म्हटलं होतं, ही नक्की कारण कोणती याचं उत्तर आता गौरवने या मुलाखतीत दिलं आहे. याचं उत्तर देत गौरव म्हणाला, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये गेली पाच वर्षे मी काम करत आहे. इथे काम करताना या पाच वर्षात तोचतोचपणा आला होता. स्किटमध्येही माझ्या प्रतिक्रिया या आपोआप यायच्या. नंतर नंतर तर मला स्किटमध्ये कळू लागलं की आता समोरचा आपल्या वाक्यानंतर काय प्रतिक्रिया देणार आहे.

आणखी वाचा – घटस्फोटानंतर पार्टी केली, थोडं रडणं झालं अन्…; सई ताम्हणकरचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, “आम्ही एकमेकांबरोबर…”

पुढे तो म्हणाला, “हे सर्व मला कळत होतं. आणि तेचतेच माझ्याकडून होत होतं. नवीन असं मला काही कळत नव्हतं. त्यामुळे मला थोडीशी ब्रेकची गरज होती. म्हणून मी थांबायचा निर्णय घेतला. तेव्हा सर म्हणाले की, घे तू ब्रेक आणि दोन-तीन महिन्यांनी परत ये. मी त्यांना नाही असं म्हटलं. आणि तोचतोचपणा येत असल्याचं सांगितलं. पाच वर्ष एकच काम करत आहे. या कार्यक्रमाने मला सर्व काही दिलं आहे. पण एक कलाकार म्हणून मला काहीच नवीन सुचत नाही आहे. नवीन प्रतिक्रिया सुचत नाहीत. मी थोडं थांबतो असं त्यांना सांगितलं”.

आणखी वाचा – घटस्फोटानंतर लग्नाची साडी टाकून न देण्याचा सई ताम्हणकरचा निर्णय, त्याचाच शिवला ड्रेस, म्हणाली, “हा ड्रेस खूप जास्त स्पेशल…”

“त्याच्यानंतर मी वेगळं असं काही केलं नाही. चित्रपट पाहिले. माझेच मी एपिसोड बघत होतो काय चुकलं ते जाणून घेतलं. मी स्वतः काय करतोय याचा अभ्यास करण्यासाठी मी वेळ घेतला. कारण काय होत की, टीव्हीवर मी दिसत होतो, इव्हेंटमध्ये मी दिसत होतो. त्यामुळे खूप दिसणं दिसणं होत होतं अर्थात ते चुकीचं नाही आहे पण ते अति प्रमाणात होत होतं. आणि त्यात माझ्याकडून नवीन असं काहीच येत नव्हतं. मला नवीन काही सुचत नव्हतं”.

Tags: gaurav moreGaurav More On Maharashtrachi Hasyajatramaharashtrachi hasyajatramarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada new promo Adhipati will be wrestling for money

पैसे कमावण्यासाठी अधिपतीचा कुस्ती खेळण्याचा निर्णय, अक्षराला नवऱ्याला साथ देणार का?, दोघांचंही बदलणार आयुष्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.