Gashmeer Mahajani Shared Incident : ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली होती. १५ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. मृत्यू झाला त्यावेळी रवींद्र महाजनी एकटेच होते. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला खूप ट्रोल करण्यात आलं. वडील एकटेच राहत होते, त्यांच्या निधनाबद्दल मुलालाही दोन दिवस माहीत नव्हतं, त्यामुळे त्याच्यावर टीका झाली.
नुकतंच रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी रवींद्र महाजनी यांचं चौथा अंक हे पुस्तक प्रदर्शित करण्यात आलं. या पुस्तकात रवींद्र यांच्याबरोबरचे अनेक किस्से, गमती-जमती सांगण्यात आल्या आहेत. दरम्यान या पुस्तक गश्मीरने सांगितलेल्या एका किस्स्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वडिलांच्या मृत्यूवरून गश्मीरला ट्रोल करण्यात आलं, मात्र एकटं राहण्याचा निर्णय हे त्यांचाच असल्याचं गश्मीरने स्पष्टपणे सांगितलं. या पुस्तकात गश्मीरने बालपणीच्या एक हादरवून टाकणाऱ्या आठवणीचे वर्णन केले आहे.
गश्मीरने हा किस्सा सांगत लिहिले आहे की, ” १० वर्षांचा असताना टेनीस प्रॅक्टीस संपवून संध्याकाळी घरी परतलो. लिविंगरुम मधील टेबलवर माझं चीज सँडविच व दुधाचा ग्लास ठेवला होता. कोचावर बाबा काळा चश्मा लावून बसले होते. वर बेडरुमकडे जाणाऱ्या जिन्यावर आई उभी होती. मी येण्याआधी त्यांच्यात जे काही सुरु होतं ते मी येताच ‘टाइम प्लीज’ घेतल्यासारखं थांबलं, कोचावर बाबांशेजारी बसून मी खायला सुरुवात केली तेव्हा आई हळू आवाजात म्हणाली, “गशू, पोलिसांना फोन लाव रे” आणि बाबा माझी टेनिस रॅकेट घेऊन तिच्यावर धावून गेले”.
आणखी वाचा – लेक असावा तर असा! संतोष जुवेकरने आई-वडिलांसाठी घेतली नवीन कार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
पुढे गश्मीरने म्हटलं की, “आई बेडरुमकडे धावली. बेडरुमच्या दारावर रॅकेट बडवण्याचा आवाज घरभर घुमू लागला, घरातील कुत्री भुंकू लागली आणि मी बसल्या जागी भोकाड पसरलं. थोड्या वेळाने बाबा शांत होऊन खाली उतरले, माझी रॅकेट कोचावर ठेवली आणि “काही झालं नाही तुझ्या आईला” असं म्हणत निघून गेले. त्या काळात असे प्रसंग आमच्या घरात वारंवार होत. फक्त कधी दार बडवले जायचे तर कधी आई एवढाच काय तो फरक” असं म्हणत त्यांचा आयुष्यातील एक कटू आठवण शेअर केली आहे.