सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच वनिता खरातची नवऱ्यासाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, “पार्टनर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 3, 2024 | 10:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vanita Kharat Post

लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच वनिता खरातची नवऱ्यासाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, "पार्टनर…"

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचे लाखो चाहते दिवाने आहेत. अशातच अभिनेत्री वनिता खरात हिने आजवर तिच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. वनिता खरात गेल्या वर्षी लग्नबंधात अडकली. गेल्या वर्षी २ फेब्रुवारी रोजी वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली. मोजक्या नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वनिता व सुमित यांचा हा लग्नसोहळा पार पडला. (Vanita Kharat Post)

वनिताच्या लग्नाचे विविध फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले होते. काल वनिता व सुमित यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. वनिताने लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच एक खास पोस्ट सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. यावेळी अभिनेत्रीने तिच्या लग्नातील एक खास फोटो शेअर करत नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत. “लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पार्टनर” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हा खास क्षण चाहत्यांसह शेअर केला आहे.

आणखी वाचा – “तिच्यावर धावून गेले अन्…”, बायकोला मारायचे रवींद्र महाजनी, गश्मीरचा मोठा खुलासा, म्हणाला, “पैसे गमावून…”

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

वनिताच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी तसेच, वनिताच्या चाहत्यांनी दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वनिताने तिच्या लग्नासाठी पांढऱ्या रंगाची साडी नऊवारी साडी, डिझायनर ब्लाऊज व पैठणी शेला असा मराठमोळा लूक केला होता. त्याबरोबर तिने पारंपरिक दागिनेही परिधान केले होते. तर सुमितने शेरवानी व फेटा असा शाही लूक केला होता. तर रिसेप्शनसाठी दोघांनी वेस्टर्न लूक केलेला पाहायला मिळाला.

आणखी वाचा – Poonam Pandey Death : बहिणीनेच दिली होती पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी, आता संपूर्ण कुटुंबाचे फोन बंद, नेमकं सत्य काय?

वनिता व सुमितच्या लग्नात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या कलाकारांनी त्यांचा लग्नात केलेल्या खास डान्सचीही चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. वनिता व सुमित सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या या खास पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Tags: entertainmentmarathi actorvanita kharatvanita kharat weddingvanita kharat wedding anniversary
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Poonam Pandey Died at 32

पूनम पांडेला झालेला जीवघेणा आजार नेमका काय?, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपचार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.