मराठी सिनेसृष्टीतील कलाकार जोड्या या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेल्या पाहायला मिळतात. अशीच एक मराठी सिनेविश्वातील कायमच सक्रिय असलेली आणि लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोग. हेमंत व क्षिती ही जोडी नेहमीच सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ या चित्रपटाच्या भरघोस यशामुळे ही जोडी विशेष चर्चेत आली. (kshitee jog on hemant dhome post)
‘झिम्मा २’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी हेमंतने उत्तमरीत्या पेलवली. तर क्षितीने या चित्रपटात निर्माती व अभिनेत्री अशा बाजू सांभाळल्या. हेमंत व क्षिती हे सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही पोस्ट करत चर्चेत असतात. हेमंतचा विनोदी जॉनर हा विशेष खास असल्याने तो नेहमीच काहीतरी विनोदी अशा पोस्ट करत असतो. अशातच हेमंतने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. यावेळी हेमंतने पोस्टसह दिलेल्या गमतीशीर कॅप्शनला गमतीशीर भाषेतच क्षितीने उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे.
क्षितीच्या या गमतीशीर कमेंटने ‘पाटलीन बाई रॉक्स’ म्हणत तिच्या चाहत्यांनी तिचं भरभरुन कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. हेमंतने सायली संजीवने काढलेला एक फोटो पोस्ट करत, “नाही नाही म्हणत बऱ्याच मागण्या असतात राव पोरींच्या. आपण कसं दिलवाला व्हायचं, बाकी होतंय की मग आपोआप”, असं गावरान भाषेत कॅप्शन दिलं आहे. हेमंतच्या या पोस्टवर क्षितीने केलेल्या कमेंटने सर्वांना हसू आवरलं नाही. क्षितीने यावर कमेंट करत, “आता भावाकडून मागण्या नाही करणार पोरी तर कोणाकडून करणार. दादा म्हणून हट्ट पुरवायचे बहिणीचे”, असं म्हटलं आहे.
हेमंत व क्षिती यांनी नाटक, चित्रपट यांसारख्या माध्यमांमध्ये आपली छाप पाडली आहे. हेमंतने आजवर अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे. तर क्षितीने मराठी सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केल्यानंतर हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःचा दबदबा निर्माण केला.